Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पुण्यातील महाविद्यालय ११ जानेवारीपासून सुरु

पुण्यातील महाविद्यालय ११ जानेवारीपासून सुरु

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी महाविद्यालय येत्या ११ जानेवारीपासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

Related Story

- Advertisement -

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी महाविद्यालय येत्या ११ जानेवारीपासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देणारी सर्व महाविद्यालय सुरु होणार आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत पुणे, नाशिक आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यातील महाविद्यालयांचा समावेश होतो. ही महाविद्यालय सुरु करताना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळम्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. दरम्यान, महाविद्यालयं कधी सुरु करायची याचा निर्णय घेण्यासाठी विद्यापीठाकडून एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमध्ये महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणते वर्ग सुरु होणार?

- Advertisement -

इंजिनिअरिंग, वास्तुकला, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, शारीरिक शिक्षण आणि व्यवसायिक अभ्यासक्रमांची द्वितीय वर्ष आणि त्या पुढील वर्षाचे वर्ग सुरू होणार आहे. तसेच कला, विज्ञान, वाणिज्य, समाजशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, पत्रकारिता आणि संज्ञापन अशा अभ्यासक्रमांचे द्वितीय वर्ष आणि त्यापुढील वर्ग सुरू होणार आहे.


हेही वाचा – रेल्वे सारखी एसटीत शेतमाल वाहतुकीसाठी सवलत द्यावी


- Advertisement -