घरताज्या घडामोडीरेल्वे सारखी एसटीत शेतमाल वाहतुकीसाठी सवलत द्यावी

रेल्वे सारखी एसटीत शेतमाल वाहतुकीसाठी सवलत द्यावी

Subscribe

राज्यातील शेतकर्‍यांच्या शेतमालांची वाहतूक करण्यासाठी भारतीय रेल्वेने किसान रेल सुरु केली. यात शेतकर्‍यांना ५० टक्के सवलत देण्यात आली असल्याने राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याच धर्तीवर एसटीच्या मालवाहतूक बसेसमध्ये राज्यातील शेतकर्‍यांना शेतमालाच्या वाहतुकीत सवलत देण्याची मागणी आता जोर धरत आहे. ही सवलत दिली तर रेल्वे स्थानकांवर शेतमाल घेऊन जाण्यासाठी शेतकर्‍यांना अव्वाचा सव्वा भाडे पडणार नाही.

एसटी महामंडळाला निर्देश द्यावे

कोरोना काळात आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी आणि एसटीचा महसूल वाढविण्याकरिता राज्य परिवहन महामंडळाने मालवाहतूक क्षेत्रात आपल्या बसेस उतरविल्या आहेत. त्याला राज्यभरातून उत्तम प्रतिसादसुध्दा मिळत आहे. विशेष म्हणजे शेतकर्‍यांकडून एसटीला पंसती दिली जात आहे. ज्याप्रमाणे भारतीय रेल्वेने शेतकर्‍यांच्या शेत मालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल सुरू करुन त्यात शेतकर्‍यांना सवलत दिली जात आहे. त्यामुळे किसान रेलमार्फत मोठा प्रमाणात शेत मालाची वाहतूक महाराष्ट्रातून होत आहे. या किसान रेलचा फायदा रेल्वे स्थानकांपासून लांब असलेल्या शेतकर्‍यांना होत नाही आहे. रेल्वे स्थानकांवर शेत माल घेउन येण्यासाठी त्यांना खासगी वाहनाची मदत घ्यावी लागत आहे. त्यामुळे जर रेल्वे स्थानकांवर आणि नवनवीन बाजारपेठांत शेतमाल घेऊन जाण्यासाठी एसटी महामंडळाने आपल्या मालवाहतुकीत शेतकर्‍यांना सवलत दिली तर राज्यातील शेतकर्‍यांचा माल योग्य भाव मिळले. तसेच खासगी मालवातूक ट्रकांची मनमानी लूट थांबेल.

केंद्राच्या धर्तीवर किसान रेल प्रमाणे महाराष्ट्र शासनाने देखील शेतकर्‍यांच्या मालवाहतुकीसाठी सवलत मुल्यांमध्ये मालवाहतूक करायला हवी. शेतक-यांचा माल बांधावरून रेल्वे स्टेशनवर व थेट मार्केट यार्डापर्यंत घेऊन जाण्याची क्षमता एसटीच्या मालवाहतुकीत आहे. मात्र कामगारांच्या या वाहतुकीतल्या काही अडचणी दूर करून शासनाने निर्णय घेऊन एसटीला फायदा मिळवून द्यावा.
– संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना
- Advertisement -

राज्य सरकारने करावी मदत

एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणार्‍या विद्यार्थी, अंध, अपंग, आदिवासी, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, पत्रकार आणि आमदार आदींना तिकिटांमध्ये सवलत दिली जाते. या सवलतीच्या रक्कम राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला दिली जाते. त्याच प्रमाणे राज्य सरकारने एसटी महामंडळाचा मालवाहतूक ट्रकमध्ये शेतकर्‍यांना केंद्रानुसार सवलत देण्यात यावी. त्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन एसटी महामंडळाला तसे निर्देश द्यावेत, अशी मागणी राज्यातील शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

 
गेल्या अनेक वर्षांपासून आमची मागणी होती की, शेत मालवाहतुकीसाठी रेल्वे सुरु करावी. त्यामुळे भारतीय रेल्वेने किसान रेल सुरु केल्याने शेतकर्‍याला नक्कीच फायदा झाला. मात्र हा माल वेळेवर आणि सुरक्षित पोहचला पाहिजे यासाठी रेल्वेकडून खबरदारी घ्यायला हवीत. तसेच रेल्वे प्रमाणे एसटी महामंडळाने सुध्दा शेत मालवाहतुकीसाठी शेतकर्‍यांना सवलत द्यावीत. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. जेणेकरुन एसटीचा मालवाहतुकीचा राज्यातील शेतकर्‍यांना फायदा होईल.
– राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

एसटी महामंडळाने नव्याने मालवातूक सुरु केली आहे. त्यामुळे इतर खासगी मालवाहतूकदारांच्या तुलनेत एसटीची मालवाहतूक कमी दरात केली जात आहे. पंरतु शेतकर्‍यांना सवलत देण्याकरिता राज्य सरकारने सवलतीपोटी प्रतिपूर्ती केली. तर निश्चित त्याच्या फायदा राज्यातील शेतकर्‍यांला होईल. तसेच एसटी महामंडळाला आर्थिक भार कमी होईल. एसटी महामंडळाला सुध्दा त्यांच्या फायदा होईल.
– मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कस काँग्रेस इंटक
- Advertisement -

 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -