घरCORONA UPDATEभाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना कोरोनाची लागण

भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना कोरोनाची लागण

Subscribe

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण

भाजपचे हडपसर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. टिळेकर यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. योगेश टिळेकर यांची प्रकृती स्थिर असून सध्या त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भाजपाच्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या प्रदेश कार्यकारिणीत योगेश टिळेकर यांना ओबीसी आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

योगेश टिळेकर यांनी ट्विट करत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं. “दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची #COVIDー19 ची तपासणी करून घेतली असतात तपासणी अहवाल पॉसिटीव्ह आला. माझी प्रकृती स्थिर आहे. तुमच्या आशिर्वादामुळे लवकरच बरा होऊन येईन. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे,” असं ट्विट करत त्यांनी माहिती दिली.

- Advertisement -

पुण्याचे महपौरांनाही कोरोनाची लागण

काल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. मुरलीधर मोहोळ यांनीही स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. शनिवारी ४ जुलै रोजी सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

“थोडासा ताप आल्याने मी माझी #COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील,” असं ट्विट करत महापौर मोहोळ यांनी माहिती दिली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -