पुण्यात तरुणीवर बलात्कार करुन केली हत्या

पुण्यात तरुणीवर घरात घुसून बलात्कार करुन केली हत्या

Pune
rape on girl in pune killed her
पुण्यात तरुणीवर बलात्कार करुन केली हत्या

पुण्यात एका अल्पवयीन तरुणीवर घरात घुसून बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचे उघडकीस आले. या घटनेमुळे पुण्यातील धायरी परिसरात जोरदार खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

नेमके काय घडले?

पुण्यातील धायरी परिसरात एका तरुणीवर घरात घुसून तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पिडितीच्या शवविच्छेदन अहवालानंतर तिच्यावर बलात्कार करुन तिचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. गुरुवारी सायंकाळी घरात कोणी नसताना आरोपींने या तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या केली. पिडितीचे आई – वडील कामावरुन घरी परतल्यानंतर घरात तरुणी निपचित पडल्याचे आढळून आले. त्यानंतर पिडितीच्या आई – वडिलांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्या तरुणीला मृत असल्याचे घोषित केले. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी अज्ञात आरोपिंविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.


वाचा – अश्लील फोटोचा धाक दाखवत तरुणीवर बलात्कार


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here