घरमहाराष्ट्रसंसदेत प्रश्न मांडणारा नेता हवा की ट्रोल होणारा? - सदाभाऊ खोत

संसदेत प्रश्न मांडणारा नेता हवा की ट्रोल होणारा? – सदाभाऊ खोत

Subscribe

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पार्थ पवार यांच्यावर टीका केली आहे. 'संसदेत प्रश्न मांडणारा नेता हवा की ट्रोल होणारा नेता?', असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. पार्थ पवार मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदरवार आहेत. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते सतत कुठल्या न कुठल्या कारणास्तव माध्यमांमध्ये चर्चेत आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांचे पहिले भाषण, प्रचार सभेदरम्यान त्यांचे ‘हरे राम हरे राम’ या गाण्यावरचे नृत्य, लोकल ट्रेनमधला त्यांचा प्रवास आणि रस्त्यावर त्यांचे धावणे या साऱ्याच घडामोडींतून ते माध्यमांमध्ये चांगलेच चर्चेत राहिले आहेत. या सर्वच गोष्टींवरुन त्यांना विरोधकांनी सोशल मीडियावर ट्रोलदेखील केले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पार्थ पवारांवर टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले सदाभाऊ खोत?

मावळ लोकसभा मतदार संघातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पार्थ पवार हे सध्या प्रचाराच्या धामधुमीत आहेत. एका सभेदरम्यान बोलताना लिहून आणलेले भाषण बोलून दाखवताना देखील ते अनेकवेळा अडखळले होते. त्यावरून पार्थ यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर आता सदाभाऊ खोत यांनी पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. सदाभाऊ खोत म्हणाले की, ‘जे नीट बोलू शकत नाहीत ते संसदेत नागरिकांचे प्रश्न काय मांडणार? भाषण करताना पार्थ पवार अनेकवेळा अडखळले होते. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.’ त्यामुळे संसदेत प्रश्न मांडणारा नेता हवा की ट्रोल होणारा नेता?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -