घरमहाराष्ट्रसाताऱ्यातील पोटनिवडणूक लांबणीवर

साताऱ्यातील पोटनिवडणूक लांबणीवर

Subscribe

संपूर्ण देशाला उत्सुकता असलेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखेची आज, शनिवारी घोषणा झाली. येत्या ऑक्टोबरला महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक होणार आहे. एकाच दिवशी महाराष्ट्र विधानसभा आणि हरियाणा विधानसभेसाठी मतदान होणार आहे. येत्या २१ ऑक्टोबर या दोन्ही राज्यांसाठी मतदान केलं जाईल. पण, या सर्वात सातारा पोटनिवडणुकीबाबतची घोषणा करण्यात आलेली नसून निवडणूक एकत्र होणार नसल्याचं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, पोटनिवडणूक अद्याप तरी लांबणीवर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यासाठी पोटनिवडणूक ही महत्त्वाची आहे. कारण, लोकसभा निवडणूक होऊन अवघे काही महिने झाले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला. भाजता नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजापात प्रवेश केला. त्यामुळे, साताऱ्यात राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे.

- Advertisement -

शिवाय, सातारा लोकसभा मतदारसंघाच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. त्यामुळे, छत्रपती उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे. पण, शनिवारी निवडणूक आयोगांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत साताऱ्याच्या पोटनिवडणुकीबाबात कोणत्याही प्रकारचा उल्लेख केला गेला नाही. त्यामुळे, नक्कीच उदयनराजे भोसले यांना मोठा फटका बसला आहे.

उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीसाठी या रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक घेतली जाईल, अशी अपेक्षा स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. पण, पोटनिवडणुकीबाबतची कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्याने उदयनराजेंना मोठा धक्का बसला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -