घरमहाराष्ट्रतीन किलो गांजासह गावठी पिस्तुल जप्त; दोघांना अटक

तीन किलो गांजासह गावठी पिस्तुल जप्त; दोघांना अटक

Subscribe

दापोडी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या इसमांकडून तीन किलो गांजा आणि जिवंत काडतुसासह गावठी पिस्तुल हस्तगत करण्यात आले असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरातील दापोडी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या इसमांकडून तीन किलो गांजा आणि जिवंत काडतुसासह गावठी पिस्तुल हस्तगत केले आहे. ही कारवाई भोसरी पोलिसांनी केलेली आहे. या प्रकरणी विशाल गोरख कदम (२७) आणि रोहन महादेव लिंगे (२०) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; पोलीस कर्मचारी सुमित दत्तात्रय देवकर आणि गोपी यांना गांजा विक्री केली जाणार आहे, याची माहिती मिळाली होती. एस.टी.वर्क शॉप रोड दापोडी याठिकाणी दोन इसम गांजा विक्रीसाठी घेऊन येणार आहेत, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार सबंधित ठिकाणी जाऊन पोलिसांनी सापळा रचत दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ३ किलो ११० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच विशाल गोरख कदम यांच्या कमरेला एक गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतुसे मिळून आले आहे. आरोपींवर भोसरी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, गुन्हे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भिवंडीतून 2 किलो गांजा जप्त


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -