घरमहाराष्ट्रछत्रपतींचा अवमान करणारा श्रीपाद छिंदम तडीपार

छत्रपतींचा अवमान करणारा श्रीपाद छिंदम तडीपार

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढून त्यांचा अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमला अहमदनगरमधून तडीपार करण्यात आले आहे. अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. छिंदम हा या निवडणुकीत प्रभाग क्र – ९ मधून निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. शिवाजी महाराजांबद्दल घृणास्पद वक्तव्य करत वाद ओढवून घेतल्यामुळे काल पोलीस प्रशासनाने छिंदमच्या तडीपारीचा प्रस्ताव ठेवला होता. काल सायंकाळी त्यावर सुनावणी झाली त्यांनतर छिंदमला तडीपारीचे आदेश देण्यात आले.

अहमदनगर महानगरपालिकेत छिंदम हा भाजप पक्षाकडून उपमहापौर या पदावर होता. मात्र एका कंत्राटदाराशी फोनवर संभाषण करत असताना त्याने शिवाजी महाराजांबद्दल अश्लिल आणि घृणास्पद शब्द वापरले होते. त्यामुळे संबंध महाराष्ट्रात छिंदम विरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता. तसेच भाजपच्या विरोधातही लोकांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे भाजपने छिंदमला उपमहापौर पदावरून बाजुला केले होते. त्यानंतर आता तो पुन्हा अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.

- Advertisement -

अहमदनगर पोलिसांनी छिंदम यासोबतच मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेले संजीव भोर तसेच ओंकार कराळे, भाऊसाहेब कराळे, मनोज कराळे आणि दिपक खैरे यांनाही तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत म्हणजेच १० डिसेंपर्यंत हे आदेश कायम राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -