घरमहाराष्ट्रपंतप्रधानांनी देश विकायला काढला आहे - मेधा पाटकर

पंतप्रधानांनी देश विकायला काढला आहे – मेधा पाटकर

Subscribe

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंत अनेक परदेश दौरे केले आहेत. या दौऱ्यामध्ये आंतरराष्ट्रीय करारावर सह्या करून त्यांनी देश विकायलाच काढला आहे,' अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंत अनेक परदेश दौरे केले आहेत. या दौऱ्यामध्ये आंतरराष्ट्रीय करारावर सह्या करून त्यांनी देश विकायलाच काढला आहे,’ अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मजा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केली. संविधान सन्मान यात्रा साताऱ्यात दाखल झाली असताना आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी मेधा पाटकर म्हणाल्या की, ‘देशात सध्या अविश्वासाचे वातावरण आहे. याला केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी कारणीभूत आहेत. हिंदू-मुस्लिमांमध्ये दरी निर्माण केली जात आहे. मागासवर्गीयांवर अत्याचार केले जात आहेत. लोकशाहीवर विश्वास नसणारे सत्तेत बसल्यामुळे अलीकडे हे प्रकार वाढले आहेत.’

मोदी सरकारची पोकळ आश्वासनं

पुढे त्या म्हणाल्या, ‘दिवसेंदिवस आपल्या देशात आर्थिक विषमत: प्रचंड वेगाने वाढत आहे. बड्या लोकांच्या कंपन्यांची प्रत्येक क्षेत्रात घुसखोरी होत आहे. त्यामध्ये मोठे अर्थकारण आणि राजकारण घडत आहे. संविधानात मूलभूत अधिकार असतानाही याचे पालन होत नाही. विकासाची दिशा मूठभर लोकांच्या हातात दिली गेली. ९३ टक्के कामगारांना पेन्शन नाही. शेतकऱ्यांना हमीभावाचे नुसते आश्वासन दिले जात आहे. भूसंपादनाचे पालन होत नाही. जातीच्या अन् धर्माच्या नावाखाली उघड-उघड हिंसा होत आहे. हा संविधानाचा अवमान आहे.

- Advertisement -

संविधानाला सातारकरांची गर्दी 

सध्या देशात अराजगता निर्माण होत असून, येत्या निवडणुकीत मत मागायला येण्यापूर्वी घटनेची नितीमूल्ये त्यांना विचारणार आहे.’ साताऱ्यात संविधान सन्मान मिरवणूकसंविधान सन्मान यात्रेचे स्वागत राजवाडा परिसरात करण्यात आले. यानंतर संविधान सन्मान मिरवणूक सुरू झाली. ही मिरवणूक राजपथमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. अभयसिंहराजे भोसले स्मृती उद्यानासमोर संविधान सभा पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने सातारकर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -