उन्हाळी सुट्टीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या

उन्हाळी सुट्टीत कोकणात तसेच गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai
Central railway
प्रातिनिधिक फोटो

मुलांच्या परिक्षा संपल्या की, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना गावाचे वेध लागतात. उन्हाळी सुट्टीत कोकणात तसेच गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड या दरम्यान दोन्ही मार्गांवर विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. या विशेष गाड्यांना पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबेल. या विशेष गाडयांना २४ डबे जोडण्यात येणार आहेत. यामध्ये २ टायर एसीचे १, ३ टायर एसीचे ४ डबे, स्लीपरचे १३ डबे आणि जनरलचे ४ डबे, एसएलआर २ डबे जोडण्यात येतील.

या आहेत विशेष गाड्या – 

गाडी क्रमांक ०१०५१/५२ लोकमान्य टिळक – करमाळी- लोकमान्य टिळक विशेष गाड्या

 • गाडी क्रमांक ०१०५१ लोकमान्य टिळक – करमाळी विशेष गाडी १७ मे ते ७ जून या काळात दर शुक्रवारी रात्री ८.४५
 • वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता करमाळीला पोहोचेल
 • गाडी क्रमांक ०१०५२ करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस ही विशेष गाडी १९ मे ते ९ जून या काळात दर रविवारी दुपारी १२.५० ला करमाळीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.२० ला एलटीटीला पोहोचेल
 • या विशेष गाड्या पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबतील
 • या विशेष गाडयांना २४ डबे जोडण्यात येणार आहेत
 • यामध्ये २ टायर एसीचे १, ३ टायर एसीचे ४ डबे, स्लीपरचे १३ डबे आणि जनरलचे ४ डबे, एसएलआर २ डबे जोडण्यात येतील

गाडी क्रमांक ०१०१६/०१०१५ करमाळी – लोकमान्य टिळक – करमाळी विशेष

 • गाडी क्रमांक ०१०१६ करमाळीःएलटीटी ही विशेष साप्ताहिक गाडी १८ मे ते ८ जून या काळात दर शनिवारी दुपारी १२.५० ला करमाळीहून सुटेल आमि त्याच दिवशी रात्री ११.५५ ला एलटीटी स्थानकात पोहोचेल
 • गाडी क्रमांक ०१०१५ एलटीटी- करमाळीःएलटीटी ही विशेष साप्ताहिक गाडी १९ मे ते ९ जून या काळात दर रविवारी मध्यरात्री १.१० ला एलटीटीहून टेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.२० ला करमाळी स्थानकात पोहोचेल
 • या विशेष गाड्या थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वस रोड, चिपळुण, खेड, रोहा, पनवेल आणि ठाणे स्थानकात थांबतील
 • या गाड्यांच्या २४ डब्यांमधील २ टायर एसीचा १ डबा, ३ टायर एसीचे ४, स्लीपर १३, जनरल ४ डबे जोडण्यात येणार आहेत

गाडी क्रमांक ०१०४५/०१०४६ एलटीटी ते करमाळी – एलटीटी विशेष

 • गाडी क्रमांक ०१०४५ ही विशेष गाडी एलटीटी ते करमाळीदरम्यान १२ एप्रिल ते ७ जून या काळात दर शुक्रवारी मध्यरात्री १.१० ला एलटीटीहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.२० ला करमाळी स्थानकात पोहोचेल
 • गाडी क्रमांक ०१०४6 ही विशेष गाडी करमाळी ते एलटीटीदरम्यान १२ एप्रिल ते ७ जून या काळात दर शुक्रवारी दुपारी १२.५० ला करमाळीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.३० ला एलटीटीला पोहोचेल
 • या गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, रोजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंदुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांत थांबतील

गाडी क्रमांक ०१०३७/३८ एलटीटी – सावंतवाडी रोड – एलटीटी

 • गाडी क्रमांक ०१०३७ ही विशेष गाडी ८ एप्रिल ते ३ जून या काळात दर सोमवारी मध्यरात्री १.१० ला एलटीटीहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १.३० ला सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल
 • गाडी क्रमांक ०१०३८ ही विशेष गाडी ८ एप्रिल ते ३ जून या काळात दर सोमवारी दुपारी २.१० ला सावंतवाडी रोडहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.२० एलटीटीला पोहोचेले
 • या गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळुण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे
 • १७ डब्यांच्या या गाडीला २ टायरी एसीचा१, ३ टायर एसीचे २, ८ स्लीपर आणि ४ जनरल डबे जोडण्यात येणार आहेत

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here