घरमहाराष्ट्रशिक्षक, वकील होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल

शिक्षक, वकील होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल

Subscribe

बीएड अभ्यासक्रमासाठी यंदा तब्बल ७२ हजार ४८९ तर एलएलबी अभ्यासक्रमासाठी ८३ हजार ६५१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

इंजिनियरींग, डॉक्टर होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असतो. मात्र आता शिक्षक आणि वकील होण्याकडेही विद्यार्थ्यांचा वाढता कल दिसून येत आहे. सीईटी सेलकडून घेण्यात येत असलेल्या सीईटी परीक्षेसाठी यंदा गतवर्षीच्या तुलनेत बीएड व एलएलबी अभ्यासक्रमांना मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. बीएड अभ्यासक्रमासाठी यंदा तब्बल ७२ हजार ४८९ तर एलएलबी अभ्यासक्रमासाठी ८३ हजार ६५१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

इंजिनियरींग शिक्षण पूर्ण करूनही नोकरीची शाश्वती नसल्याने गेल्या काही वर्षांपासून इंजिनियरींगकडे विद्यर्थ्यांचा कल कमी होताना दिसत आहे. तसेच वैद्यकीय अभ्यासक्रमाचे भरमसाठ शुल्क यामुळे हा प्रवेश अनेक विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. मात्र हमखास रोजगार मिळवून देत असलेल्या एलएलबी व बीएडच अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी एलएलबी अभ्यासक्रमासाठी अर्ज भरण्याचे दिसून येते. यावर्षी एलएलबी तीन वर्ष व पाच वर्षे अभ्यासक्रमासाठी ८३ हजार ६५१ अर्ज आले आहेत. यामध्ये एलएलबी तीन वर्षांसाठी ५५ हजार ४६७ तर एलएलबी पाच वर्षे अभ्यासक्रमासाठी २८ हजार १८४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तर गतवर्षी ५४ हजार ६२५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यामध्ये एलएलबी तीन वर्षांसाठी ३६ हजार ५१३ तर एलएलबी पाच वर्षे अभ्यासक्रमासाठी १८ हजार ११२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्याचप्रमाणे बीएड अभ्यासक्रमाला यंदा ७२ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तर गतवर्षी ४६ हजार ३१३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. बीएड आणि एलएलबी केल्यानंतर हमखास नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांकडून या अभ्यासक्रमाला पसंती मिळत आहे.

- Advertisement -

tabl 2

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -