घरमहाराष्ट्र'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेचे प्रक्षेपण सुरुच राहणार; निवडणूक आयोगाचा दिलासा

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेचे प्रक्षेपण सुरुच राहणार; निवडणूक आयोगाचा दिलासा

Subscribe

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेली 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचे प्रक्षेपण सुरुच राहणार असल्यामुळे अमोल कोल्हे यांना निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत असणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून त्यांना निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका एका खासगी वाहिनीवर सुरु आहे. डॉ. कोल्हे हे उमेदवार असल्यामुळे या मालिकेचे प्रक्षेपण थांबवावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाने या मालिकेचे प्रक्षेपण रोखता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. खासगी वाहिन्यांच्य मालिकांवर कारवाई करणे अशक्य असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

अशी करण्यात आली आहे तक्रार

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे प्रभाव पडेल, असे तक्रारीत म्हटले होते. निवडणूक आयोगाने मात्र या मालिकेचे प्रक्षेपण थांबवणे अशक्य असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

डॉ. अमोल कोल्हे यांनी मनगटावरील शिवबंधन सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात त्यांची लढत शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी होत आहे.


वाचा – ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून अमोल कोल्हे यांची एक्झिट?

- Advertisement -

वाचा – अफवांवर विश्वास ठेवू नका, मालिका सोडण्याचा विचार नाही- अमोल कोल्हे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -