घरमहाराष्ट्रचोराला भलतेच डोहाळे; सोनं-चांदी सोडून मिठाईवर टाकला दरोडा!

चोराला भलतेच डोहाळे; सोनं-चांदी सोडून मिठाईवर टाकला दरोडा!

Subscribe

या चोराने पुण्याच्या भवानी पेठेतील मिठाईचे दुकान फोडून ड्रायफ्रुट आणि मिठाईची चोरी केली. या चोराचे नाव झुरळ्या असे असून हा अट्टल गुन्हेगार आहे.

चोरं म्हटलं की, पैसे, सोनं, चांदी याची चोरी करणारे चोरं आपल्या समोर येतं. मात्र चोराने मिठाई आणि ड्रायफ्रुटची चोरी केल्याचे समोर आले आहे. पुण्याच्या भवानी पेठेत हा प्रकार घडला असून या चोराने मिठाईचे दुकान फोडून ड्रायफ्रुट आणि मिठाईची चोरी केली आहे. ड्रायफ्रुट आणि मिठाई चोरून नेणाऱ्या झुरळाला समर्थ पोलिसांनी अटक केली. झुरळ्या हा अट्टल गुन्हेगार असून त्याला तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीचा भंग करून तो शहरात आला होता. आकाश उर्फ झुरळया पाटोळे असे त्याचे खरे नाव आहे.

असा घडला प्रकार

या चोराने पुण्याच्या भवानी पेठेतील मिठाईचे दुकान फोडून ड्रायफ्रुट आणि मिठाईची चोरी केली. या चोराचे नाव झुरळ्या असे असून हा अट्टल गुन्हेगार आहे. झुरळ्याने १५ तारखेला सकाळी ६ वाजता भवानी पेठेतील मंगलम ड्रायफूट या दुकानांचे शटर उचकटून रोख ४८ हजार व मिठाई चोरली होती. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर समर्थ पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे त्याला जेरबंद केले. त्याच्याकडून ४६ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

झुरळ्या हा सराईत गुन्हेगार असून खडक आणि समर्थ पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर पंधराहून अधिक गुन्हे नोंद आहे. त्याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपारी आदेशाचा भंग करून त्या चोराने घरफोडी केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सिद्धार्थ आणि मितालीने दिली ‘गोड बातमी’
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -