ठाकरे सरकारचे प्रशासनात मोठे फेरबदल, १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

Mantralay Building
प्रातिनिधिक छायाचित्र

राज्य सरकारने मंगळवारी १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये अलीकडेच आयएएस म्हणून पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आज जारी झालेल्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांची बदली पर्यटन विभागात झाली आहे. व्ही. पी. फड, अतिरिक्त विभागीय आयुक्त औरंगाबाद यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद या रिक्त पदावर झाली आहे. पदोन्नती मिळालेले एस.एल. पाटील यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महानंदा मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे.

डी. व्ही. स्वामी उपआयुक्त महसूल नाशिक विभाग यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर या पदावर, एस. आर. चव्हाण उपायुक्त पुणे विभाग यांची नियुक्ती प्रकल्प संचालक जलस्वराज्य प्रकल्प नवी मुंबई, के. एस.तावडे अतिरिक्त जिल्हाधिकारी सिडको यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मुंबई , एस. टी. टाकसाळे अतिरिक्त विभागीय आयुक्त औरंगाबाद यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर येथे तर श्रीमती के.व्ही. द्विवेदी अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण यांची नियुक्ती अतिरिक्त महानगर आयुक्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर नेमणूक झाली आहे.

नागपूर विभागाचे उपायुक्त एस. बी. तेलंग यांची बदली महाराष्ट्र राज्य सहकार पणन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी, औरंगाबाद विभागाचे अतिरिक्त आयुक्त एस. टी. टाकसाळे यांची आदिवासी विकास विभागात नागपूर येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. नाशिक विभागाचे उपयुक्त पी. के. पुरी यांची मंत्रालयात पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागात सहसचिव म्हणून तर सी. डी. जोशी यांची महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा विभागाच्या आयुक्तपदी बदली झाली आहे.