घरमहाराष्ट्ररस्ता खचला,अपघाताची शक्यता

रस्ता खचला,अपघाताची शक्यता

Subscribe

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर हद्दीत वावंढळ पुलावर खचलेल्या रस्त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.खोपोलीहून पनवेलच्या दिशेने जाताना वावंढळ येथील नाल्यावर हा पूल आहे.साधारण पंधरा फूट उंचीचा हा पूल अपघाताचे ठिकाण म्हणून ओळखला जातो.मागील तीन वर्षांत पन्नासपेक्षा अधिक अपघात या पुलावर घडले आहेत.सर्व अपघातात पुलाचे कठडे तोडून वाहन नाल्यात कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.मागील पंधरा दिवसात दोन ट्रक एक गॅस टँकरचा अपघात पुलावर घडला आहे.पुलाच्या अगोदरचा वळणदार रस्ता यामुळे पुलाचा चालकाला अंदाज येत नसून ओव्हरटेक करताना पुलावर नियंत्रण सुटून अपघात होत आहेत.वारंवार होणार्‍या अपघाताचा परिणाम पुलावर स्पष्टपणे दिसत असून पुलावर रस्त्याला वीस फूटाची मोठी भेग पडली आहे.विशेष म्हणजे संरक्षक कठड्यालगत ही भेग असून कोणत्याही क्षणी रस्ता खचून जिवघेणा अपघात घडू शकतो.सध्या उपाययोजना म्हणून आयआरबीकडून पिंप उभे करण्यात आले असून तातडीने खचलेला भाग दुरूस्त व्हावा, अशी मागणी दररोज या मार्गावरून प्रवास करणारे उमेश विचारे यांनी व्यक्त केली आहे.

आयआरबी अधिकार्‍यांना पुलाच्या दुरावस्थेबद्दल सांगितले असता तातडीने सोमवारी दुरूस्तीचे काम करणार आहोत असे उत्तर मिळाले.तसेच वळणावर वाहनचालकांना पूर्वसूचना म्हणून सूचना फलक लावू, असे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -