पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू

Sangamner
accident
अपघात

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. हा अपघात संगमनेर शहराजवळीत कर्हे घाटात झाला आहे. एका कारने ट्रकला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. गुरुवारी मध्यरात्री ही दुर्देवी घटना घडली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. गणेश सुखदेव दराडे (२९), श्रीकांत बबन आव्हाड (२८), अजय श्रीधर पेदाम असे मृत तरुणांची नावे आहेत. या दुर्घटनेनंतर पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती.

पुणे-नाशिक महामार्गावरील नांदुर-शिंगोटे येथून तीन तरुण एका कारमधून संगमनेरच्या दिशेला जात होते. यावेळी कर्हे घाटात कारने एका ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये कारचा चक्काचूर झाला. याशिवाय कारमधील तीनही जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी यांच्यासह इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here