Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम पैठणमध्ये तिहेरी हत्याकांड,९ वर्षांच्या चिमुरडीचा गळा चिरला

पैठणमध्ये तिहेरी हत्याकांड,९ वर्षांच्या चिमुरडीचा गळा चिरला

हत्येमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Related Story

- Advertisement -

औरंगाबादच्या पैठण शहरात शनिवारी सकाळच्या सुमारास तिघांची हत्या करण्यात आली. गोदावरी नदीच्या काठाजवळ एकाच कुटुंबातील ३ जणांची हत्या करण्यात आली. यात पती,पत्नी आणि ९ वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. या तिघांचीही धारदार हत्याराने हत्या करण्यात आली. या घटनेमुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हल्ल्यात जखमी झालेल्या लहान मुलावर औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. राजु निवारे त्यांची पत्नी अश्विनी निवारे आणि ९ वर्षांची मुलगी सायली यांचा खून करण्यात आला. त्यांचा मुलगा सोहम निवारे याच्यावरही धारदार शस्राने वार करण्यात आले. यात तो गंभीररित्या जखमी झाला. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यात लहान चिमुरडीचा गळा चिरून तिची हत्या करण्यात आली.

- Advertisement -

घटनेची खबर मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. हत्या झालेल्या तिघांचे मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पैठण येथील सरकारी रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. पैठणमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळजनक चर्चा सुरू झाल्या आहेत. हत्येमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

या तिहेरी हत्याकांडाच्या घटनेने पैठण हादरले आहेत. एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली. पोलिस या हत्येमागचे कारण शोधून काढत आहे. या तिहेरी हत्याकांडाचा शोध लावण्यासाठी पोलिसांनाकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – जमिनीसाठी पोटच्या मुलानं बापाचे डोळे फोडले!

 

- Advertisement -