अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणाऱ्या शरद पवार यांची आज अहमदनगरमधील सभा संपताच पक्षाच्या दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

Ahmednagar
two ncp groups fight after sharad pawar meeting in ahmednagar

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणाऱ्या शरद पवार यांची आज अहमदनगरमधील सभा संपताच पक्षाच्या दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ही हाणामारी माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तर जगताप समर्थकाकडून कळमकर यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला असून फिर्यादी नोंदविण्याचे काम सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा – विधानसभा निवडणूक २०१९ : उमेदवार ‘इतकेच’ पैसे खर्च करु शकतो


नेमके काय घडले?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणारे शरद पवार यांच्या उपस्थित नंदनवन लॉन्स येथे मेळावा घेण्यात आला होता. हा मेळावा संपल्यावर बाहेर पडत असताना जगताप यांच्या कार्यतर्त्यांनी धक्काबुक्की केली, असा आरोप कळमकर यांनी केला. त्यानंतर ते थेट कोतवाली पोलीस ठाण्यात गेले असल्याची महिती मिळताच जगताप समर्थकही त्याठिकाणी आले. दरम्यान, कळमकर यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला. दोन्ही गटांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात समोरासमोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. महापालिका निवडणुकीपासून आमदार जगताप आणि माजी महापौर कळमकर यांच्यात राजकीय वाद निर्माण झाला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तो विकोपाला गेला असल्याचे दिसून येत आहे.


हेही वाचा – Assembly Elections 2019 : राज्यात २१ ऑक्टोबरला मतदान; २४ ला निकाल