घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या हस्ते, हुतात्म्यांच्या स्मृतीशिल्पांचे लोकार्पण

उद्धव ठाकरेंच्या हस्ते, हुतात्म्यांच्या स्मृतीशिल्पांचे लोकार्पण

Subscribe

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते क्रांतिकारकाच्या जन्मभूमीत, हुतात्मा राजगुरु पुलाचे आणि स्मृतीशिल्पांचे लोकार्पण करण्यात आले

देशासाठी बलिदान देणारे तीन क्रांतीकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या भव्य ‘स्मृतीशिल्पांचा’ तसंच भिमानदीवरील ‘हुतात्मा राजगुरु पुलाचा’ लोकार्पण सोहळा सोमवारी पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर बस स्थानकासमोर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा अर्धपुतळा अनेक दिवसांपासून उभा होता. मात्र, महामार्गाच्या रुंदीकरणामुळे या शिल्पाला काढणे गरजेचे होते. त्यामुळे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राजगुरूनगर बसस्थानकासमोरील जागा हुतात्मा राजगुरू यांच्या स्मुर्तीशिल्पासाठी उपलब्ध करून दिली. खासदार शिवाजी आढळरावपाटील यांच्या खासदार निधीतून ५० लाख रुपये खर्च करून या तीनही क्रांतिकारकांचे भव्य शिल्प याठिकाणी उभारण्यात आले आहे. दरम्यान, लोकार्पण सोहळ्याच्यावेळी खासदार शिवाजी आढळराव,आमदार सुरेश गोरे,आमदार निलम गो-हे, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

 

- Advertisement -
भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांची स्मृतिस्मारके

क्रांतिकारकांच्या या शिल्पामध्ये चारही बाजूंनी दगडी कंपाऊंड भिंत करण्यात आली आहे. तसंच शिल्पाच्या आतील बाजूस चांगल्या दर्जाच्या झाडांची लागवड करून सुसज्ज गार्डन करण्यात आलं आहे. पुणे-नाशिक महामार्गावर आणि तेही क्रांतिकारकाच्या गावांमध्ये झालेले हे स्मुर्तीशिल्प देशामध्ये एक चांगला संदेश घेऊन जाणारे स्मृतीशिल्प ठरणार आहे.


वाचा: आठवीत शिकणाऱ्या गर्भवती मुलीचा, संशयास्पद मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -