घरमहाराष्ट्रतुकाराम मुंढेंच्या कामाविरोधात गडकरींची थेट पीएमओला तक्रार

तुकाराम मुंढेंच्या कामाविरोधात गडकरींची थेट पीएमओला तक्रार

Subscribe

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचं पीएमओला पत्र

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या कामाविरोधात पीएमओला तक्रार केली आहे. पीएमओमधील हरदीप सिंग पुरी, जितेंद्र सिंग यांना गडकरींनी पत्र लिहिलं आहे. निर्णय प्रक्रियेतून दुर तुकाराम मुंढेंनी दुर ठेवलेलं होतं. यामुळे सर्वपक्षिय नगरसेवकांचा बराच काळ महानगर पालिकेमध्ये तुकाराम मुंढेंना विरोध सुरु होता. तुकाराम मुंढे मनमानी कारभार करत असतात असा आरोप देखील केला होता. दरम्यान, आता या वादात नितिन गडकरींनी हस्तक्षेप केला आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये गैरप्रकार सुरु असल्याचं नितिन गडकरींना समजताच गडकरींनी पीएमओला पत्र लिहिलं आहे. नितिन गडकरींनी बेकायदेशीर काम सुरु असल्याचं पत्रात म्हटलं आहे. गडकरींच्या पत्रानंतर या वादाला वेगळ वळण लागणार आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात नागपूरचे महापौर संदिप जोशी स्मार्ट सिटि कॉर्पोरेशनच्या बाबत स्वत: पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -