घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात स्थिर सरकार देऊ; अजित पवारांनी पंतप्रधानांना शब्द दिला

महाराष्ट्रात स्थिर सरकार देऊ; अजित पवारांनी पंतप्रधानांना शब्द दिला

Subscribe

शनिवारी सकाळी ८ वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे काही काळ प्रसिद्धी माध्यमांपासून दूरच होते. पण आता त्यांनी ट्विट करत राष्ट्रवादीमध्ये न परतण्याचे संकेतच दिले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले असून राज्यात स्थिर सरकार देऊ, असा शब्दच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी आपल्या ट्विटरचं स्टेटस बदलून आपल्या नावापुढं उपमुख्यमंत्री म्हणून संबोधलं आहे.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं ट्विट

अजित पवार यांनी शनिवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर व्यक्त झाले आहेत. यावेळी त्यांनी लागोपाठ तब्बल २१ ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तसेच महाराष्ट्रात स्थिर सरकार देऊ असे म्हटले आहे. त्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी भाजपचे अमित शाह यांच्यासह भाजपचे नेते नितीन गडकरी, निर्मला सीतारमण, स्मृति इराणी, राजनाथ सिंह, पियुष गोयल, जे. पी. नड्डा, सदानंद गौडा, मुख्तार अब्बास नक्वी, गजेंद्र सिंह शेखावत, सुरेश प्रभू, गिरीश बापट, विजय रुपाणी, मनसुख मांडवीय, अनुराग ठाकूर, धर्मेंद्र प्रधान, बी. एल. संतोष, रवी किशन, डॉ. हर्षवर्धन यांच्यासह आरपीआयचे रामदास आठवले आणि अमृता फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -