घरमहाराष्ट्रहवेच्या अंदाजावर राजकीय निर्णय घेणार - आठवले

हवेच्या अंदाजावर राजकीय निर्णय घेणार – आठवले

Subscribe

जोवर सरकार आहे तोवर मी भाजपसोबत आहे. नंतर मी हवेचा अंदाज पाहून निर्णय घेईन असे सुचक विधान केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले भाजपची साथ सोडणार का? अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. त्याला कारण म्हणजे मी हवेचा अंदाज घेऊनच निर्णय घेणार असल्याचं सुचक वक्तव्य रामदास आठवलेंनी केलं आहे. मी १० ते १५ वर्षे काँग्रेससोबत होतो. आता भाजपसोबत आहे. जोवर सरकार आहे तोवर मी भाजपसोबत आहे. नंतर मी हवेचा अंदाज पाहून निर्णय घेईन असे सुचक विधान केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. त्यामुळे रामदास आठवलेंच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? याची चर्चा आता जोरात सुरू झाली आहे. शुक्रवारी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. यावेळी काँग्रेसचे आमदार नसीम खान देखील याठिकाणी उपस्थित होते. नसीम खान यांनी काँग्रेससोबत येण्याचं आवाहन केल्यानंतर आठवले यांनी त्यांना हवा पहून निर्णय घेणार असं उत्तर दिलं.

- Advertisement -

दरम्यान, खूप दिवसांनी मला मंत्रिपद मिळालं. मी मंत्री आहे म्हणून मला जनतेचा पाठिंबा आहे अशी स्थिती नाही. मी मंत्री नसलो तरी जनता माझ्या पाठीशी उभी राहिल असा दावा देखील रामदास आठवले यांनी यावेळी केला. पण, रामदास आठवलेंची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल यासाठी आपल्याला मात्र काही काळ वाट पाहावी लागेल हे नक्की!

वाचा – पुन्हा एनडीएचेच सरकार येणार – रामदास आठवले

वाचा – दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ जिंकायच्या दृष्टीने कामाला लागा – रामदास आठवले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -