मु्ख्यमंत्री पदाचा मास्क काढून बदनामीबद्दल बोलणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

cm uddhav thackeray

मिशन बिगिन अगेन म्हणजे पुन्हा राजकारण असं नाही. मात्र, अनेकांनी ते सुरु केलं आहे. मिशन बिगिन अगेनमध्ये महाराष्ट्राच्या बदनामीचा कट केला जातो आहे. ही गोष्ट अजिबात सहन केली जाणार नाही. महाराष्ट्राच्या बदनामीचा जो डाव आखला जातोय, त्यावर मी योग्य वेळी बोलणार आहे. बोलत नाही म्हणजे माझ्याकडं उत्तर नाही असं नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी राजकारण करण्याऱ्यांना दिला आहे.

‘पुनश्च हरिओम’ याचा अर्थ पुन्हा राजकारण असा नाही. मात्र काहीजण राजकारण करत आहेत. जे राजकारण करत आहेत त्यांना करु द्या. मी सध्या या सगळ्यावर शांत आहे. या सगळ्या विषयावर मी आज बोलणार नाही. मात्र त्यावर एक दिवस मी भाष्य करणार आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. जे राजकारण करत आहेत त्यांना करु द्या.. मात्र महाराष्ट्राची बदनामी मुळीच सहन करणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

सुशांतसिंह राजपूत तसंच कंगना राणावत प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले जात आहेत. महाराष्ट्राची आणि मुंबईचा कंगनाने अपमान केला आहे. यावर थेट न बोलता वेळ आल्यावर महाराष्ट्राच्या बदनामीचा जो डाव आखला जातोय, त्याबद्दल मुख्यमंत्रीपदाचा मास्क उतरवून एकदा मी जरूर बोलणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. कोरोना संपलाय असं वाटून काही जणांनी आपलं राजकारण सुरू केलंही असेल. तूर्त मी राजकारणावर काही बोलणार नाही. मात्र, महाराष्ट्राच्या बदनामीचा जो डाव आखला जातोय, त्याबद्दल मुख्यमंत्रीपदाचा मास्क उतरवून एकदा मी जरूर बोलणार आहे. त्यातले धोके आणि इतर गोष्टी मी आपल्यापुढं मांडणार आहे. मी बोलत नाही याचा अर्थ माझ्याकडं उत्तर नाही असा अर्थ होत नाही. पण मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसलो आहे. त्या पदाला साजेसं काम आपल्याला करावं लागतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.