घरताज्या घडामोडीकोरोनामुळे गळून पडला नियम, महिलांच्या जागेवर पुरुषांचे अतिक्रमण!

कोरोनामुळे गळून पडला नियम, महिलांच्या जागेवर पुरुषांचे अतिक्रमण!

Subscribe

बेस्टमध्ये राखीव सीटवरून महिला-पुरुषांत भांडण

गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली उपनगरीय लोकल सेवा प्रवाशांसाठी बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना फक्त बेस्टच्या बसेसवर अवलंबून रहावे लागत आहे. प्रवासी संख्या वाढली असल्याने बेस्ट प्रवासासाठी शासनाने आखून दिलेल्या कोरोना प्रतिबंधनात्मक नियमावलीचे पूर्णतः तीनतेरा वाजले आहेत. आता तर बेस्ट बसेसमध्ये महिलांच्या आरक्षित आसनावरून पुरुष प्रवाशांचे महिला प्रवाशांबरोबर भांडण होत असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हेतर हा वाद पोलीस तक्रारीपर्यंत जाऊन पोहचला आहे. मात्र, बेस्ट प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

बेस्टमध्ये राखीव सीटवरून महिला-पुरुषांत भांडण

राज्य सरकारने जेव्हा पुनश्च हरिओमची घोषणा करून दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय लोकल नेमकी कधी सुरू होणार याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे खासगी कंपन्या, कार्यालयातील कर्मचारी आणि सर्वसामान्य प्रवाशांना बेस्टच्या बसेसवर अवलंबून रहावे लागत आहे. मात्र, कोरोना काळात बेस्ट बसेसचा प्रवास मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरत आहे. बेस्ट चालकांच्या रॅश ड्रायव्हिंग, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाहीत, आता तर पुरुष आणि महिला प्रवाशांमध्ये होणार्‍या भाडंणाच्या तक्रारी बेस्टकडे मोठ्या प्रमाणात येत आहेत. कारण आता अनलॉकमध्ये घरात बसलेला महिला वर्गही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कामासाठी घराबाहेर पडला आहे. मात्र, घर ते ऑफिस ते घर असा बेस्ट बसने प्रवास करताना या महिला वर्गाला अतोनात त्रासाला समोरे जावे लागत आहे. कारण 1 सप्टेंबरपासून खासगी कार्यालयातील कर्मचार्‍यांची उपस्थिती 15 टक्क्यांवरून 30 टक्के झाली, तर सरकारी कर्मचार्‍यांचीही उपस्थिती 20 टक्क्यांवरून 30 टक्के करण्यात आली. त्यामुळे बेस्ट व एसटी गाड्यांना प्रचंड गर्दी झाली आहे. त्यातच बेस्ट बसमध्ये महिलांसाठीच्या आरक्षित आसनांवर पुरष वर्ग बसून प्रवास करत असल्याने नालाईलाजास्तव महिला वर्गाला बेस्टमधून उभ्याने प्रवास करावा लागत आहे. तर काही पुरुषांना आसनावरून उठविण्यासाठी महिलांना भांडणे सुद्धा करावी लागत आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांनी बेस्टच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

लोकल बंद असल्याने आम्हाला ऑफिस कार्यालयात जाण्यासाठी एकमेव माध्यम म्हणजे बेस्ट बसेस आहेत. मात्र, आमच्या आसनांवर पुरुष वर्ग बसून प्रवास करत असल्याने नाईलाजास्तव आम्हाला बेस्टमधून उभ्याने प्रवास करावा लागत आहे. यावर बेस्ट प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.
– श्रध्दा पवार, भाईंद
- Advertisement -

बेस्ट कर्मचारी हतबल

शासनाने आखून दिलेल्या कोरोना प्रतिबंधनात्मक नियमावलीनुसार 50 टक्के प्रवासी वाहतूक करायची आहे. म्हणजे प्रत्येक आसनावर एक प्रवासी एक आणि पाच उभे प्रवासी घेण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे बस थांब्यावरील प्रवाशांना आसने रिकामी नसल्याची कल्पना द्यावी असे सुचविले आहे. असे असताना वाहक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन दहा-पंधरापेक्षा अधिक प्रवासी घेऊन आपली सेवा बजावत आहेत. त्यातही महिलांसाठीच्या आरक्षित आसनांवर पुरुष बसत असल्याने पुरुष आणि महिला प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद/ भांडणे होत आहेत. बुधवारी ठाण्याच्या खोपट ते राणीलक्ष्मीबाई मार्गांवर बेस्ट बस क्रंमाक 7208 या बसमध्ये आरक्षित आसनावर पुरुष बसल्याने मोठ्या प्रमाणात भांडण झाले. हे भांडण पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहचले आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचारी सुद्धा हतबल झाले आहेत.

पुरुष प्रवासी महिलांच्या आरक्षित आसनांवर बसल्यानंतर बेस्टच्या वाहकांकडे यासंबंधीची तक्रार केली असता काही बेस्टचे कंडक्टर त्यांना समज देतात. उठण्यास सांगतात. मात्र, तरीसुद्धा पुरुष प्रवासी ऐकत नाहीत. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने याबाबत कडक नियम बनविले पाहिजेत.
– सिध्दी नारिंग्रेकर, नेरुळ
आमचे कार्यालय सुरू झाल्यामुळे मी गेल्या महिन्याभरापासून बेस्टचा प्रवास करत आहे. मात्र, बरेचदा महिलांसाठी आरक्षित असलेल्या आसनांवर पुरुष प्रवासी बसलेले असतात. त्यांना उठण्यास सांगितले तरी ते आमचे ऐकत नाहीत. पॉईंट टू पॉईंट बस सेवेत कंडक्टर नसल्यामुळे आम्ही कोणाकडे तक्रार करायची?
– श्वेता चव्हाण, अंधेरी

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -