घरमहाराष्ट्रग्राहकाचा कुत्रा घेऊन झोमॅटो डिलिव्हरी बॉय फरार!

ग्राहकाचा कुत्रा घेऊन झोमॅटो डिलिव्हरी बॉय फरार!

Subscribe

फुड डिलिव्हरी करायला गेला आणि ग्राहकाचा कुत्रा घेऊन पळाला

भूक लागली असेल तर पटकन झोमॅटो वरुन काहीतरी मागवायचं हा आता ट्रेंड झाला आहे. झोमॅटोचे डिलिव्हरी बॉइज घर किंवा ऑफिसपर्यंत जेवण आणून देतात. पण पुण्यातील एका डिलिव्हरी बॅायने चक्क एका ग्राहकाचा पाळीव कुत्राच पळवून नेला असल्याची घटना कर्वे रोड येथे घडली आहे. वंदना शाह यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास वंदना शाह यांचा ‘डोट्टू’ नावाचा बिगल जातीचा कुत्रा बेपत्ता झाला.

असा लागला कुत्र्याचा शोध

डिलीव्हरी बॉय कुत्रा पळवून घेऊन गेल्यानंतर शाह यांनी आजूबाजूच्या परिसरात कुत्र्याचा शोध घेतला असता त्यांना कुत्रा कुठेच आढळून आला नाही. अखेर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचा निर्णय घेतला. सीसीटीव्हीमध्ये पाहिले असता कुत्रा बेपत्ता होण्याच्या आधी शाहांच्या होम कम फॅक्टरी कॉम्प्लेक्सच्या परीसरात तो फिरताना आणि खेळताना दिसत होता. खूप वेळ शोधल्या नंतरही जेव्हा तो भेटला नाही तेव्हा चिंतित झालेल्या शाह यांनी आजूबाजूच्या परीसरात कुत्र्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण, डोट्टूचा काही पत्ता लागला नाही. तोपर्यंत त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेत आपला कुत्रा हरवला असल्याची कल्पना दिली. पोलिसांनीही त्याला शोधायचं आश्वासन दिलं. या दरम्यान, वंदना यांनी एका खानावळी जवळ उभ्या असलेल्या फूड डिलिव्हरी बॉइजकडे चौकशी केली असता, त्यातील एकाने डोट्टूला ओळखले आणि त्याला त्याच्या सहकाऱ्याने घेऊन गेल्याचे सांगितले.

- Advertisement -

डोट्टूचा एका माणसासोबतचा फोटो शाहांना मिळाला असून तो माणूस तुशार नावाचा एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय असल्याचे समजले.

- Advertisement -

आम्ही त्याचा फोन नंबर घेऊन त्याला फोन केला आणि डोट्टू बदल विचारलं. डोट्टूला तोच घेऊन गेला असल्याचे त्याने कबूल केलं. पण जेव्हा आम्ही डोट्टूला परत देण्याच सांगितले तेव्हा तो कारणं देऊ लागला आणि त्याला गावी पाठवलं, असं सांगू लागला. – वंदना शाह

वंदना यांनी तुशारला पैसे देखील ऑफर केले पण तो काही न काही कारणे देऊ लागला आणि त्याने त्याचा फोन बंद केला. मग वंदना यांनी शेवटी झोमॅटो कंपनीला मदतीसाठी ट्विट केलं. यावर झोमॅटोने तातडीनं प्रतिसाद दिला, “हे अगदीच अमान्य आहे. कृपा करून तुमची वैयक्तिक आणि ऑर्डरची माहीती आम्हाला पाठवा, आमची टिम तुमच्या पर्यंत पोहोचेल”. तर पोलिसांनीही वंदना यांना मदतीचे आश्वासन दिले, मात्र त्यांची तक्रार दाखल करुन घेण्यास पोलिसांनी नकार दिला.


हेही वाचा – ‘या’ सेलेब्रेटी कपलचा खुले आम रोमान्स व्हायरल!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -