Mumbai Corona: आज दिवसभरात २ हजारांहून अधिकांनी केली कोरोनावर मात

सध्या मुंबईत २१ हजार ८४१ Active रुग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू

मुंबईची आकडेवारी

मुंबईत आज कोरोनाचे १ हजार ३२५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ३२ हजार ३९५ वर पोहचली आहे. तर ३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ हजार ५०४ वर पोहचला आहे. तर चिंतेची बाब म्हणजे सध्या मुंबईत २१ हजार ८४१ Active रुग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे आज २ हजार ३५४ रूग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत तर आतापर्यंत एकूण १ लाख ९८ हजार १२७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दिवसेंदिवस बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ८५%

मुंबईमध्ये आज १ हजार ३२५ नवे रुग्ण सापडले असून ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३५ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २८ रूग्ण पुरुष तर १० रूग्ण महिलांचा समावेश आहे. मृतांमधील २७ जण हे ६० वर्षांवरील, तर ११ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. तर दिवसेंदिवस बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ८५% आहे.

राज्यात ८,५२२ नवीन रुग्णांची नोंद

राज्यात ८५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५,४३,८३७ झाली आहे. राज्यात २,०५,४१५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज १८७ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४० हजार ७०१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.


Corona: GCC Biotech चे आरटी पीसीआर किटस् सदोष- राजेश टोपे