Mumbai Corona: आज दिवसभरात २ हजारांहून अधिकांना कोरोनाची बाधा; ४८ जणांचा बळी

मुंबईत आज कोरोनाचे २ हजार २११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

मुंबईची आकडेवारी

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून आज १०,५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५,५४,३८९ झाली आहे. राज्यात १,९६,२८८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज १५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. तर मुंबईत आज कोरोनाचे २ हजार २११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ३४ हजार ६०६ वर पोहचली आहे. तर ४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ हजार ५५२ वर पोहचला आहे.