Mumbai Corona: दिलासादायक! आज दिवसभरात २,२५७ रूग्णांना डिस्चार्ज

सध्या मुंबईत २४ हजार ७८३ Active रुग्ण

Coronavirus Update Mumbai 30 May
मुंबईची आजची आकडेवारी

मुंबईत आज कोरोनाचे २ हजार ८४८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या २ लाख १९ हजार ९३८ वर पोहचली आहे. तर ४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ हजार २४५ वर पोहचला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज २ हजार २५७ रूग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत तर आतापर्यंत एकूण १ लाख ८३ हजार ७४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तसेच चिंतेची बाब म्हणजे सध्या मुंबईत २४ हजार ७८३ Active रुग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. मुंबईमध्ये आज २ हजार ८४८ नवे रुग्ण सापडले असून ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३९ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३३ पुरुष तर १३ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील १ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ३९ जण हे ६० वर्षांवरील, तर १६ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. तर दिवसेंदिवस बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ८३% आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०. ८१ टक्क्यांवर

गेल्या २४ तासांत राज्यात १४ हजार ७१५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३५५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख ८० हजार ४८९ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३९ हजार ०७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज १६,७१५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर राज्यात आजपर्यंत एकूण ११,९६,४४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आहे आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०. ८१ % एवढे झाले आहे.


Corona In Maharashtra: आज १४,५७८ नव्या रुग्णांचे निदान; ३५५ जणांचा कोरोनाने बळी