घरमुंबईगेल्या साडेपाच वर्षांत पाण्याने घेतले ३२८ मुंबईकरांचे जीव!

गेल्या साडेपाच वर्षांत पाण्याने घेतले ३२८ मुंबईकरांचे जीव!

Subscribe

दरवर्षी पावसात किंवा एरवीही मॅनहोल्सची झाकणं उघडी राहिल्यामुळे त्यात पडून झालेल्या दुर्घटनेमध्ये गेल्या साडेपाच वर्षांमध्ये ३२८ मुंबईकरांचे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतला पाऊस आणि त्याचं गंभीर रुप मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. मात्र, माहिती अधिकारात मिळालेल्या नव्या माहितीनुसार हे रुप किती जीवघेणं आहे हेच समोर आलं आहे. गेल्या साडेपाच वर्षांमध्ये मुंबईमध्ये मॅनहोल, गटर किंवा समुद्रात व्यक्ती वाहून गेल्याच्या तब्बल ६३९ घटना घडल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यात ३२८ मुंबईकरांचे जीव गेले आहेत. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी दाखल केलेल्या अर्जाच्या उत्तरादाखल मुंबई महानगर पालिकेच्या आपातकालीन व्यवस्थापन विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या आकडेवारीवरून आता नवी चर्चा सुरू झाली आहे.

सर्वाधिक मृत्यू २०१८मध्ये

शकील अहमद यांनी महानगरपालिकेकडे २०१३ ते २०१८ या पाच वर्षांमध्ये समुद्रात वाहून गेल्यामुळे, मॅनहोलमध्ये पडल्यामुळे किंवा गटारीत पडल्यामुळे वाहून गेल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या मागितली होती त्यातून समोर आलेली आकडेवारी धक्कदायक अशी आहे. या ५ वर्षांमध्ये सर्वाधिक ७८ मृत्यू हे २०१८ या वर्षात झाले आहेत. तर २०१४मध्ये ६४ मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला आहे.

- Advertisement -

वर्ष           जखमी     मृत्यू

२०१३ –        २४        ३७
२०१४ –        २७        ६४
२०१५ –        २४        ४५
२०१६ –        ४६        ६२
२०१७ –        २५        ७८
२०१८ –        २१         ४२

- Advertisement -

हेही वाचा – उपनगरातील मॅनहोल्सवर बसवणार लोखंडी जाळ्या

दरम्यान, या आकडेवारीसंदर्भात शकील अहमद यांनी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त प्रविणसिंह परदेशी आणि प्रभात रहांगदळे यांना लेखी निवेदन देऊन अशा दुर्घटनांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -