घरमुंबईमहापौर निवासस्थानाचं अखेर कल्याण !

महापौर निवासस्थानाचं अखेर कल्याण !

Subscribe

75 lacs for internal decoration

कल्याणातील महापौर निवासस्थान गेल्या दहा ते बारा वर्षांपासून वापराविना बंद अवस्थेत आहे. मात्र, आता महापौर निवासस्थानाच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळणार आहे. येत्या १९ जानेवारीच्या महासभेत महापौर निवासस्थानाच्या दुरुस्तीचा सुमारे ७५ लाखांच्या खर्चाचा प्रस्ताव प्रशासनाने पटलावर ठेवला आहे. ठाणे, कल्याणातील महापौर बंगले ओसाड असल्याचे वृत्त दै आपलं महानगरने ५ जानेवारी रोजी प्रकाशित केलं होतं. त्यावेळी कल्याणच्या महापौर निवासाची दुर्दशा उजेडात आणली होती. त्या वृत्ताची महापौर विनिता राणे यांनी दखल घेत महापौर निवासस्थानाची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे नवीन वर्षात महापौर निवास्थानाचं कुलूप उघडणार आहे.

कल्याण पश्चिमेतील आधारवाडी जेलच्या समोरच महापौरांचे निवासस्थान बांधण्यात आले आहे. यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात आला. मात्र, बगिच्यासाठी आरक्षित जागेवर हा बंगला बांधल्याने वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. त्यानंतर पालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवून आरक्षणात बदल केला. परंतु, त्यानंतरही एकही महापौर निवासस्थानात राहण्यास गेला नसल्याने तो बंगला वापराविना बंद अवस्थेतच होता. त्यामुळे निवासस्थानाची दुर्दशा झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही महापौरांचे निवासस्थान पडून असल्याचे वृत्त दै आपलं महानगरने प्रकाशित केलं होतं. त्या वृत्ताची दखल महापौर विनिता राणे आणि त्यांचे पती नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी घेतली. त्यांनी महापौर निवासस्थानाची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानुसारच प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचा प्रस्ताव पटलावर ठेवला. सद्यस्थितीत निवासस्थानाच्या ठिकाणी सर्वत्र घाणीचे साम्राज्य असून इमारतीची अवस्था वाईट झाली आहे. सर्व बाजूंनी झाडे उगवली असून अनेक ठिकाणी गळती झाली आहे. फॉल सिलींगचे काम करणे, अंतर्गत फर्निचर, किचन, वॉटर प्रुफिंग आणि महापौर यांना भेटण्यासाठी आलेल्या अभ्यागतांसाठी टेन्साईल शेड, कपाटे, पडदे, पलंग, गाद्या, उशी, चादरी आणि अंतर्गत सजावटीची कामे तसेच इतर आवश्यक कामे करण्यासाठी सुमारे ७४ लाख ४९ हजार ९४३ रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

- Advertisement -

१९९५ साली महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली. विनिता राणे या तेराव्या महापौर ठरल्या आहेत. दहा बारा वर्षांपूर्वीच महापौर निवासस्थान बांधण्यात आलं आहे. मात्र, त्या काळात एकाही महापौरांना, महापौर बंगल्यात राहण्याचं भाग्य लाभलं नाही. येत्या एक ते दोन महिन्यात महापौर बंगल्याची दुरुस्ती झाल्यानंतर महापौर राणे यांनी महापौर निवासस्थानात राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापौर निवासस्थानात राहणार्‍या राणे या पहिल्या महापौर ठरू शकतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -