घरमुंबईलसीकरणासाठी ७६२ मास्टर ट्रेनर ; २५०० कर्मचार्‍यांना प्रशिक्षण

लसीकरणासाठी ७६२ मास्टर ट्रेनर ; २५०० कर्मचार्‍यांना प्रशिक्षण

Subscribe

मुंबई महापालिका लसीकरणासाठी सज्ज

कोरोनापासून बचाव करणारी लस कधी येणार या प्रतीक्षेत सारेच आहेत. मात्र, आता लवकरच ही प्रतीक्षा संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लस उपलब्ध झाल्यावर लसीकरणाची प्रक्रिया करण्यासाठी पालिकेची यंत्रणा सुसज्ज झाली आहे. पाच टप्प्यात मुंबईकरांना लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १.२५ लाख डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचार्‍यांना ही लस देण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी महापालिकेने ७६२ मास्टर ट्रेनर तयार केले आहेत. तसेच आतापर्यंत २५०० कर्मचार्‍यांना प्रशिक्षित केले आहे. आणखीन मनुष्यबळाची आवश्यकता भासल्यास त्याचीही पूर्व तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाबाबत चर्चा सुरू आहे. लस कधी बाजारात येणार, नागरिकांना ही लस कधीपासून उपलब्ध होणार, ही लस मोफत असणार की त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार याबाबत उलटसुलट चर्चा कानावर येत आहे. मुंबईत ही कोरोना लस कधी मिळणार, त्यासाठी काय तयारी करण्यात आली आहे, याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी मुंबईकर उत्सुक आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात लसींवर संशोधन अंतिम टप्प्यात असून ब्रिटनने मॉर्डना व्हॅक्सिनला लसीकरणाची परवानगीही दिली आहे. तसेच, भारतातही पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीला मान्यता देण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेने लसीकरणासाठी उपलब्ध होणार्‍या लसीकरणाचा साठा ठेवण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी केलेली आहे. गेल्या १४ दिवसांत मुंबई महापालिकेने ७६२ मास्टर ट्रेनर तयार केले आहेत. तसेच, आतापर्यंत २५०० कर्मचार्‍यांना प्रशिक्षित केले आहे. मात्र, लसीकरणासाठी आणखी मनुष्यबळाची आवश्यकता भासल्यास त्याबाबतची तयारीही करण्यात आली असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे. तसेच, संपूर्ण मुंबईत लसीकरण पाच टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात सव्वा लाख डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार आहे. मुंबईत महापालिकेने युद्धपातळीवर केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असून रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे.

मृत्यूदरही कमी झाला असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. सध्या कोरोनावरील विविध कंपन्यांच्या तीन लसींची अंतिम चाचणी देशभरात सुरू आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईही अंतिम टप्प्यात आली आहे. केंद्र सरकारने लस पुरवल्यानंतर आता केवळ लसीकरणाची प्रक्रिया राबवली जाणे बाकी आहे. लसीकरणाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेने १८ डिसेंबरपासून जी/उत्तर वॉर्डमधील धारावीपासून लसीकरण प्रशिक्षण सुरू केले होते. अशा प्रकारचे प्रशिक्षण प्रत्येक वॉर्डमध्ये देण्यात आले. अशा प्रकारे पालिकेच्या विविध वॉर्डमध्ये सुरू असलेले प्रशिक्षण आज पूर्ण झाले आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. कांजूरमार्ग येथील कोल्ड स्टोरेजचे काम १० जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. एकाच वेळी सुमारे १५ लाख लसींचा साठा या ठिकाणी जमा करता येणार आहे, अशी माहितीही अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -