घरमुंबईभायखळा कारागृहातील ८२ महिला कैद्यांना विषबाधा

भायखळा कारागृहातील ८२ महिला कैद्यांना विषबाधा

Subscribe

भायखळा कारागृहातील महिला कैद्यांना अन्न आणि पाण्यातून विषबाधा झाली आहे. जवळपास ८२ महिला कैद्यांना विषबाधा झाली असून त्यांना उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भायखळा कारागृहातील महिला कैद्यांची प्रकृती अचानक बिघडली. जवळपास ८२ महिला कैद्यांना उपचारासाठी जे. जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या कैद्यांना अन्न आणि पाण्यातून विषबाधा झाली आहे. शुक्रवार सकाळीपासून या महिला कैद्यांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

४८ तास राहणार निरिक्षणाखाली

भायखळा कारागृहातील ८२ महिला कैद्यांवर जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या महिला कैंद्यांमधील दोन महिला प्रेगनेंट आहे. तर विषबाधा झालेल्यांमध्ये एका लहान बाळाचा समावेश आहे. या सर्व महिला कैद्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना जे जे रुग्णालयतील आपत्कालिन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. या कैंद्यांना ४८ तास निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचे जे जे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.

- Advertisement -

जे जे रुग्णालयाला छावणीचे स्वरुप

या कैद्यांवर जे जे रुग्णालयात उपचार सुरु असल्याने जे जे रुग्णालयाला छावणीचे स्वरुप आहे. रुग्णालयाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहेत. सध्या भायाखळा कारगृह प्रशासनाकडून यासंदर्भात तपास सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -