घरमुंबईपोलिसांकडूनच गर्दुल्ल्यांना अभय मिळत असल्याचा स्थानिक रहिवाशांचा आरोप

पोलिसांकडूनच गर्दुल्ल्यांना अभय मिळत असल्याचा स्थानिक रहिवाशांचा आरोप

Subscribe

गर्दुल्ल्यांच्या विरोधात कुलाबावासिय पोलिसात

चरस, गांजा यांसारख्या अंमली पदार्थांची विक्री कफ परेडमध्ये सर्रास होत आहे. गर्दुल्ले दिवसाढवळ्या अंमली पदार्थाचे सेवन करून धिंगाणा घालत असल्याने स्थानिक रहिवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही पोलिसांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे पोलिसांकडूनच गर्दुल्ल्यांना अभय मिळत असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत.

कफ परेडमधील शिवशक्तीनगरमध्ये दिवसाढवळ्या रस्त्यावर गर्दुल्ल्यांकडून गांजा, चरस व दारूचे सेवन सर्रासपणे सुरू असते. हा रस्ता रहदारीचा असल्याने येथून शाळकरी मुले, कामावर जाणार्‍या महिला व वृद्धांची ये-जा असते. परंतु गर्दुल्ल्यांचा धिंगाणा रस्त्यावरच सुरू असल्याने मुली-महिलांना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागते. गर्दुल्ल्यांना कोणी हटकले तर त्याला ते बेदम मारहाण करतात. त्यामुळे त्यांना जाब विचारण्याचा कोणीही प्रयत्न करत नाहीत.

- Advertisement -

गर्दुल्ल्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार केल्यास ते त्यांच्यावर तात्पुरती कारवाई करून त्यांना सोडून देत असल्याने हे प्रकार असेच सुरू राहत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या प्रकाराबाबत पोलिसांकडे वारंवार पत्रव्यवहार करणार्‍या संतोष पवार यांना गर्दुल्ल्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईबाबत पवार यांनी शंका उपस्थित केली आहे.

कफ परेड पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष अंमली पदार्थविरोधी पथक तयार करून या भागात कारवाई केली होती. २०१७ मध्ये या प्रकरणी १३६ गुन्हे दाखल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. यावर्षी ९४ गुन्हे दाखल केली असल्याची माहिती कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रश्मी जाधव यांनी सांगितलेे. (व्हीडीओ पाहण्यासाठी क्लिक करा माय महानगर)

- Advertisement -

कफ परेडमध्ये सुरू असलेल्या सर्व बेकायदेशीर गोष्टींवर आम्ही नेहमीच कारवाई करतो. गर्दुल्ल्यांच्या धिंगाण्याबाबत तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.
-रश्मी जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,कफ परेड पोलीस स्टेशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -