अनधिकृत बांधकामांवरील कारवाई सुरूच

Mumbai

अतिक्रमणमुक्त फुटपाथ, अनधिकृत बॅनर्स आणि पोस्टर्सवरील कारवाई अंतर्गत रविवारी पाचव्या दिवशीदेखील शहरात विविध ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली असून हातगाड्या, टपर्‍या, बॅनर्स आणि फुटपाथवरील बांधकामे हटवण्यात आली. ही कारवाई महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मागर्दर्शनाखाली करण्यात आली.

ठाणे शहरामध्ये विविध परिसरात महानगरपालिकेची सुरु असलेली अतिक्रमण कारवाई जोरदार सुरु असून कारवाईच्याविविध परिसरातील टपर्‍या, पोस्टर्स व फुटपाथवरील बांधकामे निष्कासित करण्यात आली.रविवारी पाचव्यादिवशी करण्यात आलेल्या कारवाई अंतर्गत नौपाडा प्रभागसमिती, माजिवडा प्रभाग समिती, लोकमान्य सावरकर प्रभाग समिती, वागळे प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती, उथळसर प्रभाग समिती, दिवा प्रभाग समिती, कळवा प्रभाग समिती, वर्तकनगर प्रभाग समिती या सर्व प्रभाग समिती मधील अनधिकृत फेरीवाले, हातगाड्या, फुटपाथवरील बांधकामांवर महापालिकेच्यावतीने धडक कारवाई करण्यात आली. शहरातील अतिक्रमण, अनधिकृत बॅनर्स आणि पोस्टर्सवरील ही कारवाई सर्व सहाय्यक आयुक्त यांनी पोलिस बंदोबस्तात केली.