घरताज्या घडामोडीअक्षय कुमारला एक छोटी चूक महागात पडली!

अक्षय कुमारला एक छोटी चूक महागात पडली!

Subscribe

अक्षय कुमारच्या हातून चूक घडली आणि या चुकीसाठी त्याला पत्नी ट्विंकल खन्नाची ट्विटरवरून जाहीरपणे माफी मागावी लागली.

एक छोटीशी चूक आपल्याला इतकी महागात पडू शकेल, याचा विचारही अक्षय कुमारने केला नव्हता. त्यातही चूक अशीही थेट पोटावर लाथ पडायची. पण अक्षय कुमारच्या हातून चूक घडली आणि या चुकीसाठी त्याला पत्नी ट्विंकल खन्नाची ट्विटरवरून जाहीरपणे माफी मागावी लागली. आता हे चुकीचे प्रकरण काय तर ते जाणून घेऊया…

अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ या सिनेमाला कालच दोन वर्षे झालीत. त्यानिमित्त काल अक्षयने सोनम कपूर आणि व राधिका आपटे सोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करत आनंद व्यक्त केला होता. ‘पॅडमॅन’ या सिनेमाला दोन वर्षे पूर्ण झाली. ज्या मुद्यावर बोलायला लोक कचरतात, त्याच मुद्यावर आम्ही एक सिनेमा बनवला, याचा मला आनंद आहे. मला आशा आहे की, गरिबी आणि मासिक पाळीसंदर्भातील कालबाह्य विचार आपण समूळ नष्ट करू शकू, असे अक्षयने आपल्या या ट्विटमध्ये लिहिले.

- Advertisement -

या ट्विटमध्ये त्याने सोनम कपूर आणि राधिका आपटेला टॅग केले. मात्र ही पोस्ट करताना अक्षय बायकोला विसरला आणि तिने हीच चूक नेहमी हेरली. मग काय तिने ट्विटरवरच नाराजी व्यक्त केली. तेव्हा अक्षयला जाग आली. अक्षय पॅडमॅन संदर्भातील ट्विटमध्ये ट्विंकलचे नाव टाकायला विसरला. होय, कारण ट्विंकल ही ‘पॅडमॅन’ची निर्माता आहे.

अक्षयला त्याची चूक लक्षात आणून देत ट्विंकलने लगेच एक ट्विट केले. ‘तू नक्कीच माझ्या पुढील प्रोडक्शनचा भाग नसणार आहेस,’ असा दम तिने भरला. ट्विंकलने खुलेआम त्याला चित्रपटात घेणार नाही, असे सांगितल्यावर अक्षयला माफी मागावीच लागली. ‘कृपया माझ्या पोटावर लाथ नको मारुस चित्रपटाची निर्माता ट्विंकल खन्ना, दिग्दर्शक आर बालकी आणि ज्यांच्याशिवाय हा चित्रपट अपूर्ण आहे ते ए मुरुंगनाथम यांची मी माफी मागतो’ असे त्याने लिहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -