ज्येष्ठ नाट्यकर्मी अरुण काकडेंचे निधन

अविष्कार नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा आणि समांतर रंगभूमीवर रंगायन नाट्यसंस्थेचे संस्थापक सदस्य अरुण काकडेंचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे.

Mumbai
Arun kakade passed away
अरुण काकडे

अविष्कार नाट्यसंस्थेचे सर्वेसर्वा आणि समांतर रंगभूमीवर रंगायन नाट्यसंस्थेचे संस्थापक सदस्य अरुण काकडेंचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. दुपारी २.३० वाजता मुंबईत त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. पन्नासहून अधिक वर्ष रंगभूमीवर कार्यरत असणारे आणि नाट्यवर्तुळात काकडे काका या नावाने ओळखले जाणाऱ्या काकडे काकांच्या निधनामुळे रंगभूमीवर शोककळी पसरली आहे. अरुण काकडे हे सुमारे सात दशके प्रायोगिक रंगभूमीची अव्याहत सेवा करणारा मराठी नाट्य चळवळीतील एक निष्ठावंत कार्यकर्ता अविष्कारनाट्यसंस्था ज्याच्या खांद्यावर उभी राहिली असा मजबूत खांब म्हणून अरुण काकडे यांची ओळख आहे.

काकडे काकांनी गेली ६७ वर्ष प्रायोगिक रंगभूमीशी असलेले आपले नाते टिकवून ठेवले आहे. तसेच अजूनही उतारवयातही त्यांनी तरुणांना लाजवील अशा उत्साहाने नवीन नाटके सादर केली आहेत. त्यांच्या या एकूण योगदानाचा गौरव भारतीय संगीत नाटक अकादमीने त्यांना गौरव पुरस्कार देऊन केला होता.

असा होता त्यांचा प्रवास

पुण्यातून काकडे काकांनी करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर ते मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी विजया मेहता, अरविंद देशपांडे, विजय तेंडुलकर, माधव वाटवे यांच्यासोबत रंगकर्मींनी ‘रंगायन’ ही संस्था सुरू केली होती. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या नाटकांची निर्मिती केली. मात्र, काही दिवसांनी ‘रंगायन’मध्ये वाद झाले आणि त्या वादानंतर ती संस्था फुटली. ही संस्था फुटल्यानंतर त्यांनी अरविंद देशपांडे, विजया मेहता, सुलभा देशपांडे यांच्यासोबत १९७१ मध्ये ‘आविष्कार’ ही नवी नाट्यसंस्था स्थापन केली. या संस्थेमध्ये काकडे या मंडळींच्या खांद्याला खादा लावून उभे राहिले. तसेच त्यांनी या संस्थेच्या व्यवस्थापनाची देखील धुरा सांभाळली. त्यानंतर काकडे काका आणि ‘आविष्कार’ हे समीकरणच बनून गेले होते. जे आजवर कायम राहिले.

निर्मिती सूत्रधार राहणे केले पसंत

त्यानंतर ‘आविष्कार’ने छबिलदास चळवळ उभी केली. या चळवळीतून अनेक नाट्यसंस्था आणि नाट्यकर्मी पुढे आले. तसेच रंगभूमीवरचे अनेक महत्त्वाचे प्रयोग या चळवळीच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्याचप्रमाणे प्रत्येक नवा प्रयोग हा ‘आविष्कार’ने करावा हा त्यांचा ध्यास असायचा. काकडे काकांना नेहमी स्वतः पडद्यामागे राहून काम करायला आवडायचे. ते त्यासाठी अविरत झटत असायचे. त्यांना प्रसिद्धीची हाव नव्हती. त्यामुळे त्यांनी कायमच निर्मिती सूत्रधार या भूमिकेत राहणे पसंत केले होते.


हेही वाचा – आशा भोसले यांना सॅल्फर्ड विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी