घरमुंबईभिवंडीत जिल्हा उपाध्यक्षांवर दोनवेळा हल्ल्याचा प्रयत्न

भिवंडीत जिल्हा उपाध्यक्षांवर दोनवेळा हल्ल्याचा प्रयत्न

Subscribe

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष राजेश उर्फ विजू गायकर यांच्यावर विरोधकांनी गोडावून डेव्हलपमेंटच्या वादातून रिव्हॉल्वरमधून गोळीबार करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न २० ऑक्टोबर २०१८ रोजी पडघा – खडवली रस्त्यावरील आन्हे गावाजवळ केला होता. मात्र नशीब बलवत्तर म्हणून गायकर त्या खूनी हल्ल्यातून बालंबाल बचावले होते. मात्र त्यांच्यावर पुन्हा २० एप्रिल २०१९ रोजी दोघा अज्ञात हल्लेखोरांनी गुप्तीने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात कलम ३५२,३४ , ३७ (१) ,१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजू गायकर हे त्यांची इनोव्हा कार सर्व्हिस सेंटरवर धुवत असताना त्या ठिकाणी सुरुवातीला समीर घोडविंदे हे त्यांच्या फॉर्च्युनर गाडीतून आले. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ पल्सर २२० मोटार सायकलवरून दोघे हल्लेखोर हातात गुप्ती घेऊन आले व त्यांच्या दिशेने अंगावर धावून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी देखील गायकर यांनी सतर्कतेने शेजारच्या घरात आसरा घेतल्याने त्यांचा जीव बचावला आहे.पहिल्या गोळीबाराच्या हल्ल्यातील फरार आरोपींना पकडण्यात पडघा पोलीस टाळाटाळ करीत असल्यानेच पुन्हा खूनी हल्ला झाला आहे.असा आरोप विजू गायकर यांनी केला आहे.

- Advertisement -

आन्हे गावच्या हद्दीत ५०० कोटींचा गोडावून डेव्हलपमेंट प्रोजेक्ट साकारत आहेत.त्यात विरोधकांना भागीदारी हवी होती.मात्र त्यास गायकर यांनी नकार दिल्याने त्यांचा कायमचा काटा काढण्याच्या हेतूने शूटर्सना सुपारी देवून कायमचा संपवण्याचा कट आखण्यात येत आहे.सहा महिन्यापूर्वी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.सदरचा कट विरोधक सचिन घोडविंदे ,समीर घोडविंदे ,अजय पाटील ,एकनाथ भोईर,जितेंद्र घावट,राम ठाकरे यांनी रचला आहे. आतापर्यंत सचिन घोडविंदे ( रा.आन्हे ) ,गौतम काशिनाथ शिंदे (२५ रा.खातिवली ) व हर्षद सुरेश येमकर (२४ रा. पुणे ) ,शूटर्स महेश उर्फ महाराज मधुकर चांदिलकर आणि विनायक सुरेश चव्हाण (रा.पूणे ) आदी पाच जण न्यायालयीन कोठडीत आहेत.तर समीर घोडविंदे ,अजय पाटील ,एकनाथ भोईर,जितेंद्र घावट,राम ठाकरे,सोमा चव्हाण ,मंगेश सांबरेकर ,चेतन उर्फ मामा लिम्हन आदी पाच कटकारस्थानी व हल्लेखोर अद्यापी फरार असून हे सर्वजण सार्वजनिक कार्यक्रमात बिनबोभाटपणे फिरत असल्याने या हल्लेखोरांना स्थानिक पोलिसांचा आशीर्वाद असल्याची चर्चा नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.या गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -