मुंबईत महिन्याभरासाठी ड्रोन उड्डाणास बंदी

Mumbai
Quadcopter_camera_drone_in_flight
प्रातिनिधिक फोटो

ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलमार्फत उडवण्यात येणारे अतिलघु (मायक्रोलाईट) विमाने, ड्रोन आदींचा वापर दहशतवादी अथवा असामाजिक तत्वांकडून दुर्घटना घडवण्यासाठी होऊ शकतो. हे टाळण्यासाठी बृहन्मुंबई हद्दीत आजपासून दिनांक २२ फेब्रुवारीपर्यंत ड्रोनसारख्या उपकरणांच्या उड्डाणास बंदी घालण्यात आली आहे. दहशतवादी अथवा राष्ट्रविरोधी तत्वांकडून जीवितास आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याच्या हेतूने ड्रोनसारख्या उपकरणांचा वापर हवाई हल्ल्यांसाठी होऊ शकतो. या कारणांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका ठरु शकणाऱ्या बाबींना आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून यानुसार पुढील महिन्याभरासाठी बृहन्मुंबई क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलमार्फत उडवण्यात येणारी अतिलघु (मायक्रोलाईट) विमाने आदी उडविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ नुसार बृहन्मुंबईच्या पोलीस आयुक्त कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकान्वये देण्यात आले आहेत.