घरमुंबईआधी फुलपाखरे येतील...नंतर माणसेही

आधी फुलपाखरे येतील…नंतर माणसेही

Subscribe

ठाण्यातील मेंटल हॉस्पिटल येथील गणेश उद्यानालगत उभे असलेले डेब्रिजचे डोंगर आणि त्यातून येणारी दुर्गंधी, उद्भवणारे आजार यातून कायमचा उपाय निघावा म्हणून ठामपाच्या वतीने या जागेवर 60 लाख रुपये खर्च करून फुलपाखरु उद्यान उभारण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 19 मध्ये सुमारे 1700 चौ.मी. जागेत नव्याने तयार करण्यात आलेल्या या उद्यानाचा लोकार्पण कार्यक्रम 8 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे व ठाण्याच्या महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे, यांच्यासह सभागृह नेते नरेश म्हस्के आणि स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.

उद्यानाच्या जागेवर यापूर्वी मोठ्या प्रमाणात कचरा, डेब्रीज आणि टाकाऊ वस्तू टाकून तेथे रॅबिटचे डोंगर तयार झाले होते. त्यामुळे या विभागात दुर्गंधी, डास याचा प्रादुर्भाव वाढला होता. वारंवार साफसफाई करुनही तोच प्रकार घडत असे. त्यामुळे ठामपाच्या वतीने यावर कायमचा उपाय काढण्यात आला.

- Advertisement -

या उद्यानात पेंटास, करवंदा, लॅण्टना येलो, लॅण्टना हळदीकूंकूम, लॅण्टना लॅव्हंडर अ‍ॅण्ड व्हाईट, पावडर पफ, फॅमिलिया, क्युफिया, इक्सोरा, पिंक, रेड ही झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांमुळे फुलपाखरे आकर्षित होत असून, सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात फुलपाखरांचे थवेच्याथवे या उद्यानात येत आहेत. तसेच रॅफिज पाम ही झाडे लावण्यात आली असून, या झाडांमध्ये फुलपाखरे लपून राहतात. त्यामुळे या उद्यानात त्यांचे वास्तव्य आहे. त्याचप्रमाणे मनीप्लांटच्या वेली वेगवेगळया झाडांवर आकर्षकपणे सोडण्यात आल्या आहेत. या आगळ्या-वेगळ्या फुलपाखरु उद्यानामध्ये नागरिकांना फिरण्यासाठी पायवाट, पदपथ, लॉन, हिरवळ, हॅगिंग ब्रीज तसेच पिंक, ऑरेंज, व्हाईट, रेड, पर्पल, ब्ल्यू, यलो अशा विविध प्रकारच्या कमळांसाठी पाण्याचे पॉट तयार करण्यात आले आहेत.

इंटरनेटवर फुलपाखरु उद्यानाबाबत माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारे या गलिच्छ जागी फुलपाखरु उद्यान निर्माण करावे अशी कल्पना मनात आली आणि त्याचा पाठपुरावा करून या संकल्पनेतून सुंदर, सुशोभित आणि फुलपाखरुंना आकर्षित करणारी अशी विविध प्रकारची झाडे लावून फुलपाखरू उद्यान बनविण्यात आले.-नरेश म्हस्के, सभागृह नेते ठामपा

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -