भाभा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

वांद्र्यातील के. बी. भाभा हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी तेथील उपहारगृह बंद करण्यात आल्यामुळे काम बंद आंदोलन पुकारले आहे.

Mumbai
भाभा हॉस्पिटल

वांद्र्यातील के. बी. भाभा हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी तेथील उपहारगृह बंद करण्यात आल्यामुळे काम बंद आंदोलन पुकारले आहे. आज, गुरुवारी सकाळपासूनच कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत हॉस्पिटल प्रशासनाचा विरोध करण्यास सुरुवात केली आहे. भाभा हॉस्पिटलमधील उपहारगृह म्हणजेच कॅन्टीन अग्निशमन दलाची परवानगी असतानाही एच पश्चि विभागातील सह आयुक्त आणि भाभा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक हे दादागिरी करुन बंद करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. याच्याच निषेधार्थ हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. दोन दिवसांपूर्वीही असेच आंदोलन या हॉस्पिटलमध्ये करण्यात आले होते. परंतू कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी एकत्र येत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

वाचा – जे.जे. हॉस्पिटलची सुपरस्पेशालिटी वर्षभरापासून कागदावरच!

पर्यायी व्यवस्थेची होतेय मागणी 

सध्या याविषयी कर्मचारी संघटना आणि हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत वाडेकर यांची बैठक सुरू आहे. महापालिकेचे जे कॅन्टीन आहे तिथे ओपीडी शिफ्ट केली जाणार आहे. पण, मग कर्मचाऱ्यांनी जेवायचं कुठे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. कॅन्टीनऐवजी दुसऱ्या कोणत्याच पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली नसल्यामुळे हे काम बंद आंदोलन करण्यात आलं असल्याच, येथील कर्मचाऱ्यांनी म्हटल आहे.

वाचा – जे. जे. हॉस्पिटलमध्ये ‘समाजसेवा विभाग’ सुरू

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here