कल्याणात हरवली माणुसकी

जखमींना हॉस्पीटलममध्ये नेण्याऐवजी व्हिडियो काढणे महत्वाचे ?

Mumbai

उल्हासनगर आणि कल्याणला जोडनार्‍या वालधुनी पुलावर शुक्रवारी रात्री बाईक आणि ट्रकचा समोरासमोर अपघात झाल्याने बाईकस्वार दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मुरबाडच्या सरळ गाव येथे राहणारे योगेश पवार आणि अनिल विशे हे दोघे अपघातानंतर रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले होते. पण ये-जा करणारे लोक व्हिडियो काढत होते. मात्र कुणीही या दोघांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला नाही. अखेर काही तरुणांनी पुढाकार घेत दोन्ही जखमींना हॉस्पिटल मध्ये दाखल केले. मात्र ते वाचू शकले नाहीत, कदाचित व्हिडियो काढण्याऐवजी लोकांनी जखमीला रुग्णालयात वेळेवर पोहचवले असते तर त्यांचा जीव वाचू शकला असता.

या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकास ताब्यात घेतले आहे. मुरबाड येथील सरळगाव येथे राहणारे योगेश आणि अनिल हे दोघेही मोटरसायकलने येत असतानाच भरधाव टेम्पोची मोटारसायकल जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता कि मोटरसायकलचे अक्षरश: तुकडे झाले होते. तर रस्त्यावर रक्ताचा सडा पसरला होता. हा भीषण अपघात पाहून अनेकांना भोवळही आली. अपघाताची माहिती समजताच महात्मा फुले पोलिसांनी धाव घेतली आणि नागरिकांच्या मदतीने जखमींना हॉस्पीटलमध्ये दाखल केले. मात्र तोपर्यंत खूपच उशिर झाला होता. जेवढा वेळ नागरिकांनी या जखमींचे व्हिडीओ बनवण्यात घालवला तेवढ्या महत्वाच्या वेळेत त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यासाठी घालवला असता तर कदाचित त्यांचे प्राण वाचवता आले असते.