घरमुंबईमुंबईचा पुढचा महापौर भाजपचा - राम कदम

मुंबईचा पुढचा महापौर भाजपचा – राम कदम

Subscribe

सगळ्यात जास्त जागा जिंकूनही विरोधी बाकावर बसावे लागल्यामुळे आता भाजप यापुढे सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची रणनीती आखत असून मुंबई महानगरपालिकेचा पुढचा महापौर हा भाजपचा असेल असे मत भाजप आमदार राम कदम यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. गेल्या वेळेला आम्ही एक ते दोन जागांवर कमी पडलो होतो, मात्र आता मुंबईचा महापौर भाजपचा असेल असे ते म्हणाले. आज दादर मधील वसंत स्मृती येथे भाजपची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या संघनात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली. तसेच मुंबईचे २२७ वॉर्डचे अध्यक्ष,
३६ विधानसभा अध्यक्ष तसेच ६ लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष यांची येणाऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती आणि फेरनियुक्ती यावरही चर्चा झाली.

म्हणून या सरकारला वाटते भीती

हे सरकार स्थापन होऊन ११ दिवस झाले. मात्र तरी देखील यांना खाते वाटप करता आलेले नाही. मंत्रिपद कुणाला द्यायचे याचा विचार हे सरकार करत आहे. त्याचे कारण म्हणजे फार मोठा गट फुटेल ही भीती या सरकारला वाटत आहे, असे राम कदम यावेळी म्हणाले. आधी आमदार लपवून ठेवले आणि आता सरकार स्थापन झाले तरी यांच्यामध्ये एक मोठा गट फुटेल अशी भीती आहे.

- Advertisement -

तसेच हे विकास विरोधी सरकार आहे. कंत्राटदारानी यांना भेटावं असे यांना वाटत आहे का? विकासाची कामे यांना थांबवता येणार नाही. या सरकारचा आम्ही निषध करतो, असे सांगत ठेकेदारांनी यांना का भेटावे? असा सवाल देखील राम कदम यांनी उपस्थित केला. तसेच गेल्या पाच वर्षातील विकास कामांना स्थगिती देऊन महाविकास आघाडी कंत्राटदार आपल्याकडे येण्याची वाट पाहत आहेत का? असे देखील ते यावेळी म्हणालेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -