घरमुंबईभाजपचे लोकसभेचे तिकीट 100 कोटी

भाजपचे लोकसभेचे तिकीट 100 कोटी

Subscribe

लातूर ते दिल्ली विमानप्रवास

भारतीय जनता पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी १०० कोटी रुपये मोजावे लागत असल्याचा घणाघाती आरोप दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आमदार अमित देशमुख यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूरमधील अहमदपूर येथे काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.

सध्या पेपरमध्ये जाहिरातींचा भडीमार आहे. मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण सुरू आहे. देशाच्या इतिहासात भाजपने दाखवून दिले की, सत्ता पक्ष काय-काय चुकीचे करू शकतो. लातूरहून दिल्लीला जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट ५ हजार रुपये आहे. लातूरहून दिल्लीला विमानाने जाण्याचे तिकीट २० हजार रुपये आहे. पण लातूरहून दिल्लीला जाण्याचे भाजपचे लोकसभेचे तिकीट १०० कोटी रुपयांना मिळत असल्याचा आरोप अमित देशमुख यांनी केला. तसेच यांची चौकशी होणे गरजेचे आहे. ही लोकशाहीची आणि मतदारांची चेष्टा असल्याचे त्यांनी म्हटले.

- Advertisement -

यावेळी अमित देशमुख यांनी भाजपवर सडकून टीका करताना म्हटले की, २०१४ मध्ये ’अच्छे दिन आने वाले है’ म्हटले होते. त्यानंतर आता ‘सबका साथ सबका विकास’, असे सांगितले जात आहे. २०१६ मध्ये मोदींनी ‘न्यू इंडिया’ची घोषणा केली. २०१७ मध्ये ‘मेरा देश बदल रहा है’, २०१८ मध्ये ’साफ नियत सही विकास’, २०१९ मध्ये ‘मै भी चौकीदार’ची घोषणा यांच्याकडून करण्यात येत आहे. परंतु, लोक चौकीदार चोर असल्याचे सांगतात, असेही अमित देशमुख यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -