मध्य रेल्वेवर रात्रकालीन तर पश्चिम, हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक

Mumbai
Mega block

मध्य रेल्वे मार्गावर रेल्वेच्या विविध कामांकरिता शनिवार आणि रविवारी रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉक दरम्यान कुर्ला ते शीव या स्थानकांदरम्यान पुलाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी माटुंगा ते कुर्ला दरम्यान दोन्ही दिशेकडे जाणार्‍या धीम्या आणि जलद मार्गावर शनिवार आणि रविवारी मध्यरात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान पुलाचे गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकात मध्ये बदल करण्यात आले आहे. रात्री १२ वाजून १८ मिनिटांची सीएसएमटी ते ठाणे आणि रात्री १२ वाजून ३१ मिनिटांची सीएसएमटी ते कुर्ला लोकल, पहाटे ५ वाजून ५४ मिनिटांची कुर्ला ते सीएसएमटी लोकल रद्द करण्यात आली आहे. शनिवारी रात्री ११ वाजून १२ मिनिटांची कल्याण ते सीएसएमटी लोकल कुर्ला स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहे. अंबरनाथ ते सीएसएमटी रात्री १० वाजून १ मिनिटांची लोकल ठाणे स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे.

यासह साईनगर शिर्डी ते सीएसएमटी, पंढरपूर ते सीएसएमटी, मॅगलोर ते सीएसएमटी एक्स्प्रेस रविवारी आणि सोमवारी दादर स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे.सीएसएमटी मार्गवरील मेल, एक्स्प्रेस गाड्या मार्गातील रेल्वे स्थानकावर थांबविण्यात येणार आहेत. मुंबई मेल चेन्नई ते सीएसएमटी, कोणार्क एक्सप्रेस भुवनेश्वर ते सीएसएमटी, अमृतसर ते सीएसएमटी एक्सप्रेस, कन्याकुमारी ते सीएसएमटी एक्स्प्रेस, हुसेनसागर एक्सप्रेस हैद्राबाद ते सीएसएमटी, गडग-सीएसएमटी एक्सप्रेस,हावडा ते मुंबई मेल व्हाया नागपूर, नागपूर-सीएसएमटी नंदिग्राम एक्स्प्रेस या गाड्यांना उशीराने चालविण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी, बेलापूर, पनवेल स्थानकाच्या दोन्ही दिशेकडे जाणार्‍या मार्गावर रविवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे जम्बोब्लॉक
पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते गोरेगाव दरम्यान अप-डाउन धिम्या मार्गावर स.10.35 ते दु.3.35 वाजेपर्यंत जम्बोब्लॉक घेणार आहेत.या ब्लॉकदरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे . परिणामी अप-डाऊन मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here