घरताज्या घडामोडीCorona : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण

Corona : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण

Subscribe

सोमवारी अभिनेत्री पायल घोषनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यावेळी पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि नेते देखील उपस्थित होते. आज सकाळी रामदास आठवले यांची केलेली चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबई रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रामदास आठवलेंना सौम्य लक्षणं असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या कार्यक्रमात जे उपस्थित होते, त्यांनी देखील सतर्क राहण्याचं आवाहन रिपाइंकडून करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.

दरम्यान, ‘रामदास आठवले यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत. कार्यकर्त्यांनी, चाहत्यांनी काळजी करू नये. वैद्यकीय सल्ल्यानुसार मुंबईत एका खाजगी रुग्णालयात चार दिवसांसाठी ते दाखल होणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे आणि शासकीय बैठकांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत’, असं रिपाइंने जारी केलेल्या पत्रकात नमूद केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -