मध्य आणि हार्बर रेल्वेवर सलग दुसऱ्या दिवशी अघोषित ब्लॉक

ब्लॉकमुळे दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. प्रवाशांची सर्व रेल्वे स्थानकावर गर्दी झाली असून लोकस सेवा २० ते २५ मिनिटं उशिराने सुरु आहे.

Mumbai
central and harbor railway held block without prior notice
मध्य आणि हार्बर रेल्वेवर सलग दुसऱ्या दिवशी अघोषित ब्लॉक

सलग दुसऱ्या दिवशी मध्य आणि हार्बर रेल्वेवर अघोषित ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. कोणतिही पूर्वसूचना न देता ब्लॉक घेतल्यामुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत आहे. सध्या मध्य रेल्वेवर १२.५५ ते १.२५ या कालावधीमध्ये ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. प्रवाशांची सर्व रेल्वे स्थानकावर गर्दी झाली आहे. सध्या लोकल सेवा उशिराने सुरु आहे.

दरम्यान, मंगळवारी मध्य आणि हार्बर रेल्वेने मध्येच ब्लॉक घेतला होता. मधल्या दिवशी गर्दीच्या वेळी अशाप्रकारे ब्लॉक घेतला जात नाही मात्र सलग दुसऱ्या दिवशी ब्लॉक घेतल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. सध्या गाड्या २० ते २५ मिनिटं उशिराने सुरु आहेत. एक तर उन्हाळ्याचे दिवस असल्याने मुंबईकरांना प्रचंड गर्मीचा सामना करावा लागत आहे. अशातच एकाच ठिकाणी लोकल थांबल्यामुळे आणि प्लॅटफॉर्मवर गर्दी झाल्यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत.