घरमुंबईमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; डोंबिवली स्थानकावर एकही लोकल नाही

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; डोंबिवली स्थानकावर एकही लोकल नाही

Subscribe

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून डोंबिवली स्थानकात गेल्या १५ मिनिटांपासून एकही लोकल आलेली नाही. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

नव्या वर्षातही मुंबईकरांचे हाल सुरुच आहेत. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. डोंबिवली स्थानकात १५ मिनिटांपासून एकही लोकल रेल्वे स्थानकावर आली नसल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळच्या वेळेत वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. डोंबिवली स्थानकावर सकाळच्या वेळेस गेल्या १५ मिनिटांपासून एकही लोकल आली नसल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याचे कारण अद्याप कळलेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -