बापूंना आदरांजली! रेल्वेच्या २७ इंजिनांवर महात्मा गांधीचे चित्र

येत्या २ ऑक्टोबरला राष्ट्रपती महात्मा गांधी यांची १५० वी जयंती आहे. यानिमित्ताने रेल्वेच्या इंजिनांवर गांधीजींचे चित्र रेखाटण्यात येणार आहे.

Mumbai
रेल्वेच्या 27 इंजिनांवर महात्मा गांधींचे चित्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त मध्य रेल्वेच्या डीजेल इंजिनांवर महात्मा गांधीजींचे चित्र रेखाटण्यात येत आहे. आतापर्यंत 15 डीजेल लोकोमोटिव्हवर गांधीजींचे चित्र रंगविण्यात आले आहे. येत्या 2 ऑक्टोबर रोजी सीएसएमटीहून एक लोकोमोटिव गाडीला जोडून चालविण्यात येणार आहे.

यावर्षी महात्मा गांधीजींची 150वी जयंती साजरी करण्यात येत आहे.त्या निमित्त रेल्वेत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. रेल्वेच्या लोकोमोटिववर गांधीजींचे चित्र रेखाटण्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून हाती घेण्यात आले आहे.सध्या 15 डिझेल लोकोमोटिववर गांधीजींचे चित्र रंगविण्यात आले आहे. हे इंजिन मुंबई ते पुणे आणि मुंबई-कोकण मार्गावर धावत आहे. आणखी 7 लोकोमोटिववर गांधीजींचे चित्र रंगविण्याचे काम सुरू आहे.

मध्य रेल्वेच्या कल्याण लोकोशेडमध्ये हे काम केले जात आहे. रेल्वेचे मास्टरक्राफ्टसमॅन आणि पेंटर चिंतामन दोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम काम करीत आहे. गांधीजींनी संपूर्ण जगाला अहिंसा आणि स्वच्छतेची शिकवण दिली, अशा महान राष्ट्रपित्याला रेल्वेकडून ही एक प्रकारे आदरांजली असल्याचे मत चिंतामन दोंडे यांनी व्यक्त केले आहे.