घरताज्या घडामोडीकूपर रुग्णालयात लसीकरण, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना दिली सर्वप्रथम लस

कूपर रुग्णालयात लसीकरण, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना दिली सर्वप्रथम लस

Subscribe

महापालिकेच्या विलेपार्ले स्थित डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात कोविड-१९ संसर्गावरील लसीकरणाचा शुभारंभ आज (शनिवारी) करण्यात आला. यावेळी राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांना सर्वप्रथम लस टोचण्यात आली. देशव्यापी लसीकरण शुभारंभाचा एक भाग म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दृकश्राव्य माध्यमातून या रुग्णालयात लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे प्रकल्प संचालक डॉ. रामास्वामी, सहायक संचालक डॉ. पाडवी, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. कंथारिया, डॉ. परदेशी, महानगरपालिकेचे उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. देविदास क्षीरसागर, कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. पिनाकिन गुज्जर, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष रेवणकर, उपकार्यकारी आरोग्याधिकारी डॉ. श्रीमती दक्षा शाह, नोडल ऑफिसर डॉ. संजय पांचाळ, डॉ. श्रीमती अनिता शेनॉय, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मंगेश कुंभारे, इतर सहकारी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईत एकाच वेळी १ कोटी २ लाख लस साठवणुकीची क्षमता


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -