Coronavirus Mumbai: मुंबईत कोरोनाचे ११५० नवे रुग्ण; ५३ मृत्यू

Mumbai
Mumbai Coronavirus daily Update
मुंबईमधील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी

मुंबईमध्ये शुक्रवारी ११५० नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ४५ हजार ८५४ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १५१८ वर पोहचला आहे.

मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातात्याने वाढ होत असून, शुक्रवारी कोरोना रुग्णांनी ४५ हजारांचा आकडा ओलांडला. मुंबईमध्ये शुक्रवारी ५३ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ४७ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २८ पुरुष तर २५ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील दोघांचे वय ४० वर्षांखाली आहे. ३२ जण हे ६० वर्षांवरील, तर १९ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे ७५८ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ३४ हजार ८२३ वर पोहचली आहे. तसेच ६९९ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल १८ हजार ७९७ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.